Video: वाहतुकीच्या जाचक दंडाचा असा नोंदविला निषेध; हेल्मेट ऐवजी घातले पातेले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 04:04 PM2019-09-17T16:04:52+5:302019-09-17T16:05:15+5:30

देशात नवीन मोटार वाहन कायदा  1 सप्टेंबरपासून लागू झाला आहे. त्यामुळे बेशिस्त वाहन चालविणारे आणि वाहतूक नियम मोडणाऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

Video: Prohibited Trafficking Penalties; Pot Instead Of Helmet | Video: वाहतुकीच्या जाचक दंडाचा असा नोंदविला निषेध; हेल्मेट ऐवजी घातले पातेले

Video: वाहतुकीच्या जाचक दंडाचा असा नोंदविला निषेध; हेल्मेट ऐवजी घातले पातेले

Next

देशात नवीन मोटार वाहन कायदा  1 सप्टेंबरपासून लागू झाला आहे. त्यामुळे बेशिस्त वाहन चालविणारे आणि वाहतूक नियम मोडणाऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. वाहन चालकांना शिस्त लागावी यासाठी नवीन मोटार वाहन कायद्यात दंडाची रक्कम दहापटीने वाढविण्यात आली आहे. तसेच नवे वाहतुकीचे नियम लागू झाल्यानंतर नवनवीन किस्से समोर येत आहेत. त्यातच आता सरकारने लागू केलेल्या नवीन मोटार कायद्याचा गुजरातमधील नागरिकांनी डोक्यावर पातेले घालून निषेध व्यक्त केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नवीन मोटार वाहन कायद्यानूसार मोठ्या प्रमाणात दंड आकरण्यात येत असल्याने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात राज्यातच या नवीन मोटार कायद्याचा विरोध होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. नवीन मोटार कायदा लागू झाल्यानंतर राजकोटमध्ये 240 वाहनांवर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन प्रकरणी कारवाई करत एकूण 1 लाख 14 हजार रुपयांची वसूली करण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी हेल्मेट ऐवजी पातेले घालून वाहतुकीच्या जाचक दंडाचा निषेध नोंदविला आहे.

 गुजरात सरकारने मोटार वाहन कायद्यात बदल करत अनेक नियमांच्या दंडांची रक्कम कमी केली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मोटार वाहन कायद्यात बदल करण्यात येत असल्याची माहिती दिली. या नवीन बदलानुसार दंडाची रक्कम 50 टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. मात्र, पूर्वीच्या आणि नवीन नियमानुसार पोलिसांची कारवाई सुरूच आहे. त्यानुसार, विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या वाहनचालकांकडूनही दंड आकारण्यात येत आहे.

1 सप्टेंबरपासून पाच राज्ये वगळता अन्य राज्यांमध्ये नवीन वाहतूकीचे नियम लागू झाले आहेत. यामध्ये अव्वाच्या सव्वा दंड आकारला जात आहे. नव्या कायद्यानुसार मर्यादेपेक्षा वेगाने वाहन चालविणे, विना परवाना गाडी चालविणे, हेल्मेट व सीट बेल्टचे नियम न पाळणे आदींसाठी पूर्वीच्या तुलनेत पाचपट दंड आकारण्यात येत आहे. त्यातच आता ओडिशामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन प्रकरणी दंड भरुन एका ट्रक ड्रायव्हरनं सर्वात मोठी पावती फाडल्याचे समोर आले होते.

Web Title: Video: Prohibited Trafficking Penalties; Pot Instead Of Helmet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.