नितीन गडकरी स्वत: कोणती कार वापरतात? डिझेल की ईलेक्ट्रीक...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 14:03 IST2021-03-09T14:00:44+5:302021-03-09T14:03:11+5:30
Which car does Nitin Gadkari use?: वाढत्या पेट्रोल, डिझेलच्या किंमतीवर महाराष्ट्राचे लाडके आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इलेक्ट्रीक, इथेनॉल, बायोडिझेलसारख्या पर्यायांचा रेटा लावला आहे. परंतू, स्वत: कोणती कार वापरतात असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

नितीन गडकरी स्वत: कोणती कार वापरतात? डिझेल की ईलेक्ट्रीक...
वाढत्या पेट्रोल, डिझेलच्या किंमतीवर महाराष्ट्राचे लाडके आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी इलेक्ट्रीक, इथेनॉल, बायोडिझेलसारख्या पर्यायांचा रेटा लावला आहे. परंतू, स्वत: कोणती कार वापरतात असा प्रश्न अनेकांना पडला आहे. लोका सांगे ब्रम्हज्ञान...य़ा उक्तीप्रमाणे तर नाही ना...! तसे नाहीय. गडकरींनी जनतेला सांगण्याआधी स्वत:पासून सुरुवात केली आहे. (Union Minister Nitin Gadkari has ditched his official bulletproof Toyota Fortuner for a MG ZS EV in Nagpur, Maharashtra.)
महत्वाचे केंद्रीय मंत्रिपद आणि भाजपाच्या वरिष्ठ नेते पदाचे वलय असल्याने नितीन गडकरींना टोयोटा कंपनीची बुलेटप्रूफ फॉर्च्युनर कार देण्यात आली होती. मोठे मंत्री असल्याने त्यांची सुरक्षाही तेवढीच महत्वाची आहे. ही कार डिझेलवर चालणारी होती. परंतू गडकरींनी ही कार राज्य सरकारला परत केली आहे. भारतात सध्या टाटाच्या दोन, ह्युंदाईची एक आणि एमजी मोटर्सची एक अशा हाताच्या बोटावर मोजता येतील अशा इलेक्ट्रीक कार आहेत. यापैकी गडकरींनी त्यांच्या शहरात नागपूरमध्ये एमजी मोटर्सच्या झेडएस ईव्हीला (MG ZS EV) पसंती दिली आहे. गडकरी नागपूरमध्ये याच कारमधून फिरतात. ही कार गडकरींच्या ताफ्यात फेब्रुवारीतच दाखल झाली आहे.
Electric Vehicle: इलेक्ट्रीक कार, स्कूटर घेण्याची पाच महत्वाची कारणे; जाणून घ्या...
यावर गडकरींनी सांगितले की, मी स्वच्छ वाहतूकीचा पुरस्कर्ता आहे. यामुळे मी आता इलेक्ट्रीक कार वापरतो. यामुळे प्रदूषण कमी होते. आता ही कार गडकरींनी स्वत: खरेदी केलीय की त्यांच्यासाठी ESSL ने घेतलीय हे स्पष्ट झालेले नाहीय. परंतू गडकरींनी नागपूरमध्ये ईलेक्ट्रीक कारना प्रोत्साहन मिळेल आणि स्वच्छ हवेचे शहर बनेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
इलेक्ट्रिक वाहनांसंबंधीचे हे आहेत 5 मोठे गैरसमज; जाणून घ्या MG Moters च्या ZS EV कडून...
ईलेक्ट्रिक वाहने ही भविष्यातील वाहने
वाहन क्षेत्रातील सध्याच्या प्रगतीच्या मार्गानुसार, ईव्हीमध्ये एक तर्कशुद्ध बाब आहे. जीवाश्म इंधनावर चालणाऱ्या वाहनांना बाजूला सारण्याचे वाढते प्रमाण, यातच या ट्रेंडचे भवितव्य दिसून येते. तांत्रिक प्रगतीमुळे अपारंपरिक, शाश्वत ऊर्जा स्रोत हे अधिक व्यवहार्य आणि किंमतीनुसार प्रभावी असून वाहन उद्योग वेगाने नावीन्यपूर्ण वीज निर्मिती पर्याय स्वीकारत आहे. परिणामी, इलेक्ट्रिक आधारीत वाहने ही सर्वसामान्य बनत असून, इंटर्नल कम्बस्शचन इंजिन्स (आयसीई) हे या चक्रात मागे पडत आहेत.
Car Driving Tips: पेट्रोल, डिझेलचे दर वाढतायत; अशी घाला वाहनाच्या घटत्या मायलेजला लगाम...