नव्या जुन्या सर्वांसाठी...! ईलेक्ट्रीक वाहनेच नाही मोबाईलही स्वस्त होणार; बॅटरीच्या किंमती कमी होणार, अर्थसंकल्पात घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 12:56 IST2025-02-01T12:56:36+5:302025-02-01T12:56:51+5:30

Income Tax Budget 2025 : इलेक्ट्रीक वाहनांमध्ये लिथिअम आयन बॅटरी वापरली जाते. बॅटरी नसलेल्या वाहनाची किंमत जेवढी त्याहून अधिक या बॅटरीची किंमत असते.

Union Budget on Electric Vehicles: 2025 For everyone, new and old...! Not only electric vehicles, mobile phones will also be cheaper; Li Battery prices will be reduced, announced in the budget | नव्या जुन्या सर्वांसाठी...! ईलेक्ट्रीक वाहनेच नाही मोबाईलही स्वस्त होणार; बॅटरीच्या किंमती कमी होणार, अर्थसंकल्पात घोषणा

नव्या जुन्या सर्वांसाठी...! ईलेक्ट्रीक वाहनेच नाही मोबाईलही स्वस्त होणार; बॅटरीच्या किंमती कमी होणार, अर्थसंकल्पात घोषणा

India Budget 2025 news: पेट्रोल, डिझेल वाहनांच्या तुलनेत महागडी असणारी ईलेक्ट्रीक वाहने स्वस्त होणार आहेत. अर्थमंत्र्यांवी आजच्या अर्थसंकल्पात या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. ईलेक्ट्रीक वाहनांमधील महागडी असलेली बॅटरीच स्वस्त करण्यात येत आहे. 

इलेक्ट्रीक वाहनांमध्ये लिथिअम आयन बॅटरी वापरली जाते. बॅटरी नसलेल्या वाहनाची किंमत जेवढी त्याहून अधिक या बॅटरीची किंमत असते. सीतारामण यांनी या बॅटरीमध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांवरील कर कमी करण्याची घोषणा केली आहे. कोबाल्ट हा महागडा पदार्थ देखील स्वस्त केला जाणार आहे. यामुळे लिथिअम आयनच्या बॅटरीची किंमतही कमी होणार आहे. 

या घोषणेमुळे केवळ इलेक्ट्रीक वाहनेच नाही तर मोबाईलही स्वस्त होणार आहेत. ईलेक्ट्रीक स्कूटरच्या किंमती कमी होणार आहेत. याचा फायदा नव्याने ईव्ही घेणाऱ्यांना होणार आहे. तसेच ज्या लोकांनी ईव्ही घेतल्या आहेत, त्यांची बॅटरी खराब झाली तरीही त्यांना नवी बॅटरी बदलताना याचा फायदा मिळणार आहे. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2024) संसदेत सादर केला. अर्थमंत्री म्हणून त्यांचा हा सलग आठवा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पात वेगवेगळी उत्पादनं आणि सेवा यांच्यावरील प्रत्यक्ष (डायरेक्ट) आणि अप्रत्यक्ष कर ( इन-डायरेक्ट टॅक्स) मध्ये बदल करण्याची घोषणा केली. त्यामुळे काही उत्पादनं स्वस्त होतील. तसंच नवीन करवाढीमुळे इतर उत्पादनांच्या किमती वाढू शकतात. मुख्यत्वे कॅन्सर, ईव्ही या गोष्टींवरील कर कमी करण्यात आला आहे.

Web Title: Union Budget on Electric Vehicles: 2025 For everyone, new and old...! Not only electric vehicles, mobile phones will also be cheaper; Li Battery prices will be reduced, announced in the budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.