दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 16:23 IST2025-09-09T16:22:37+5:302025-09-09T16:23:05+5:30
GST cut on Hero Motorcycles: कारवरील जीएसटी काही लाखांपर्यंत कमी होणार आहे. परंतू, दुचाकींचे काय? तर दुचाकींवरही सहा ते १५ हजारांपर्यंत जीएसटी कमी होणार आहे.

दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
जीएसटीमुळे सर्वच वस्तूंच्या किंमती कमी होणार आहेत. वाहन हे सर्वांशी निगडीत विषय आहे. आजही दर महिन्याला साडेतीन लाख कार आणि १०-१२ लाख दुचाकी विकल्या जात आहेत. कारवरील जीएसटी काही लाखांपर्यंत कमी होणार आहे. परंतू, दुचाकींचे काय? तर दुचाकींवरही सहा ते १५ हजारांपर्यंत जीएसटी कमी होणार आहे.
हिरो कंपनीची सर्वाधिक खपाची स्प्लेंडर ८ हजार रुपयांनी स्वस्त होणार आहे. तर त्याहून स्वस्त असलेली एचएफ डीलक्स सहा हजारांनी स्वस्त होणार आहे. तसेच १२५ सीसीची एक्स्ट्रीम आर ही ९-१० हजारांनी स्वस्त होणार आहे. दुचाकींवरील २८ टक्के जीएसटी कमी होऊन तो १८ टक्क्यांवर येणार आहे, याचा फायदा आता ग्राहकांना होणार आहे.
सध्या स्प्लेंडर पुण्यात ऑनरोड ९३ हजारांच्या आसपास आहे, ती ८४-८५ हजारांवर येणार आहे. एचएफ डीलक्स ही ७७ हजाराला आहे ती ७० हजारापर्यंत येणार आहे. तर एक्स्ट्रीम ही १.१० हजारांवर असून ती १ लाखाच्या आसपास येणार आहे. जीएसटी हा एक्सशोरुम किंमतीवर लागतो, यामुळे ही किंमत कमी होणार आहे.
टीव्हीएस रायडरची किंमत 8000 रुपयांनी कमी होणार आहे. तर बजाज पल्सर १२५ सीसीची किंमत देखील एवढ्याच फरकाने कमी होणार आहे. स्कूटरवरही ८ ते १०-१२ हजार रुपयांचा फायदा होणार आहे.