शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
2
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
3
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
4
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
5
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
6
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
7
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
8
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
9
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
10
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
11
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
12
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
13
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
14
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
15
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
16
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
17
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
18
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
19
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
20
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?

Traffic Rules: ट्रॅफिक पोलिसाला गाडीची चावी काढण्याचा अधिकार आहे? जाणून घ्या ट्रॅफिक संदर्भातील नियम...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 15:02 IST

Traffic Rules: रस्त्याने गाडी चालवत असताना अनेक वेळा ट्रॅफिक पोलीस अडवतात. अनेकदा पोलीस आपल्या गाडीची चावी काढून घेतात, पण त्यांना असं करण्याचा अधिकार असतो का..?

Traffic Rules: रस्त्याने गाडी चालवत असताना अनेक वेळा ट्रॅफिक पोलीस अडवतात. अनेकदा पोलीस आपल्या गाडीची चावी काढून घेतात, पण त्यांना असं करण्याचा अधिकार असतो का..? भारतात पोलिसांच्या गैरवर्तनाची अनेक उदारहणे आपण ऐकतो अथवा पाहतो. अशा परिस्थितीत एक चालक म्हणून आपल्याला आपले अधिकार माहीत असायलाच हवेत. आज आम्ही तुम्हाला वाहनांची चावी काढण्यापासून ते इतरही काही आवश्यक नियमांसंदर्भात माहिती देणार आहोत.

हे डॉक्यूमेन्ट्स नक्की सोबत ठेवा आपण नियमांचे काटेकोरपणे पालन केले तर आपल्याला घाबरण्याचे काहीही कारण नाही. मात्र, काही आवश्यक कागदपत्रे आपण नेहमीच वाहन चालवताना सोबत ठेवायला हवीत. जसे, Registration certificate (आरसी), Pollution under control (पीयूसी), Insurance document आणि Driving licence.

हे नियम आपल्याला माहित असायला हवेत

  • वाहतूक पोलिस अधिकाऱ्याने नेहमीच गणवेशात असायला हवे. युनिफॉर्मवर बक्कल नंबर आणि त्यांचे नाव असावे. ते गणवेशात नसतील तर तुम्ही पोलीस कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र विचारू शकता. जर त्यांनी ते दाखविण्यास नकार दिला, तर आपणही आपले डॉक्यूमेंट्स दाखविण्यास नकार देऊ शकता.
  • आपल्याकडे त्या क्षणी दंडाचे पैसे भरण्यासाठी पैसे नसतील, तर आपण ते नंतरही भरू शकता. अशा स्थितीत न्यायालय चालान जारी करते, तेही न्यायालयात जाऊन भरावे लागेल. या काळात वाहतूक अधिकारी आपले ड्रायव्हिंग लायसन्स त्यांच्याकडे ठेवू शकतात.
  • आपले चालान कापण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे चालान बुक अथवा ई-चलान मशीन असणे आवश्यक आहे. जर यांपैकी काहीच नसेल तर आपले चालान कापले जाऊ शकत नाही. 
  • जर ट्रॅफिक पोलिसाने आपले कुठलेही कागदपत्र जप्त करण्याचा निर्णय घेतला असेल अथवा जप्त करत असेल, तर त्याची पावतीही मागून घ्या.  एक
  • पोलीस अधिकारी आपल्या परवानगीशिवाय आपल्या कारची चावी घेऊन जाऊ शकत नाही. जर ट्रॅफिक पोलीस तुमच्या गाडीची चावी काढून घेत असेल, तर तुम्ही त्या घटनेचा व्हिडीओ बनवू शकता. हा व्हिडीओ तुम्ही त्या भागातील पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यास दाखवून तक्रारही करू शकता. 
टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसPoliceपोलिसcarकारbikeबाईक