शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

ट्रॅफिक कॉन्स्टेबल तुमच्या गाडीची चावी काढू शकतात का?, तुम्हाला काय अधिकार; पाहा काय म्हणतो नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 19:17 IST

जर हवालदार तुमच्या गाडीची चावी काढत असतील तर तेही नियमांच्या विरोधात आहे. तुम्हाला अटक करण्याचा किंवा वाहन जप्त करण्याचा अधिकारही हवालदाराला नाही. मात्र, अनेकांना याची माहिती नसते.

आपल्या धावपळीच्या जीवनात आपण गाडी चालवताना अनेक वेळा चुका करतो. जसे, कार चालवताना सीट बेल्ट लावायला विसरलो दुचाकी चालवताना हेल्मेट नसेल किंवा वाहनाचा लाईट किंवा हॉर्न नीट वाजत नसेल तर तोही ड्रायव्हिंगचा दोष मानला जातो. असं असलं तरी याचा अर्थ असा नाही की ट्रॅफिक हवालदार तुमचे चालान फाडू शकतात. जर हवालदार तुमच्या गाडीची चावी काढत असतील तर तेही नियमांच्या विरोधात आहे. तुम्हाला अटक करण्याचा किंवा वाहन सिझ करण्याचा अधिकारही त्यांना नाही. मात्र, अनेकांना याची माहिती नसते. अनेकदा आपली झालेली चूक आणि समोर असलेले पाहून अनेकांची भांबेरी उडते. परंतु अशा वेळी आपल्याही अधिकारांची आपण माहिती ठेवली पाहिजे.

हवालदारांना चावी काढण्याचा अधिकार नाहीभारतीय मोटार वाहन कायदा 1932 अंतर्गत, केवळ एएसआय स्तरावरील अधिकारीच वाहतुकीच्या नियमांच्या उल्लंघनासाठी तुमचे चालान कापू शकतात. एएसआय, एसआय, इन्स्पेक्टर यांना जागी दंड आकारण्याचे अधिकार आहेत. यांना मदत करण्यासाठी वाहतूक हवालदारच असतात. कुणाच्याही गाडीच्या चाव्या काढण्याचा अधिकार त्यांना नाही. एवढेच नाही तर ते तुमच्या गाडीच्या टायरची हवाही काढू शकत नाहीत. ते तुमच्याशी चुकीच्या पद्धतीने बोलू शकत नाहीत. वाहतूक पोलीस तुम्हाला विनाकारण त्रास देत असतील, तर तुम्ही त्याच्यावरही कायद्यानं कारवाई करू शकता.

या गोष्टी ठेवा लक्षात

  • तुमचे चालान कापण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे चालान बुक किंवा ई-चलान मशीन असणे आवश्यक आहे. जर या दोघांपैकी काहीही त्यांच्यासोबत नसेल तर तुमचे चालान कापले जाऊ शकत नाही.
  • वाहतूक पोलिसांनीही गणवेशात असणे गरजेचे आहे. युनिफॉर्मवर बकल नंबर आणि त्यांचे नाव असावे. ते गणवेशात नसतील तुम्ही पोलीस कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र विचारू शकता. 
  • वाहतूक पोलिसांचे हेड कॉन्स्टेबल तुम्हाला फक्त १०० रुपयांचा दंड करू शकतो. यापेक्षा जास्त दंड, फक्त वाहतूक अधिकारी म्हणजेच एएसआय किंवा एसआय करू शकतात. म्हणजेच ते १०० रुपयांपेक्षा जास्त चालान करू शकतात.
  • जर ट्रॅफिक हवालदार तुमच्या गाडीची चावी काढून घेत असतील तर तुम्ही त्या घटनेचा व्हिडीओ बनवा. हा व्हिडीओ तुम्ही त्या भागातील पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्याला दाखवून तक्रार करू शकता.
  • वाहन चालवताना तुमच्याकडे तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची मूळ प्रत, पीयुसी असणे आवश्यक आहे. त्याच वेळी, वाहन नोंदणी आणि विम्याची झेरॉक्स देखील असली तर चालू शकते.
  • जर तुमच्याकडे त्या क्षणी दंडाचे पैसे भरण्यासाठी रक्कम नसेल तर तुम्ही नंतर दंड भरू शकता. अशा परिस्थितीत न्यायालय चालान जारी करते, तेही न्यायालयात जाऊन भरावे लागेल. या काळात वाहतूक अधिकारी तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स त्यांच्याकडे ठेवू शकतात.

कलम १८३, १८४ आणि १८५ अंतर्गत कारवाईया प्रकरणी माहिती देताना अधिवक्ता गुलशन बगोरिया यांनी सांगितलं होतं की, मोटार वाहन कायदा १९८८ मध्ये पोलीस कर्मचाऱ्याला वाहन तपासणीदरम्यान वाहनाची चावी काढण्याचा अधिकार देण्यात आलेला नाही. पोलीस कर्मचार्‍यांनी तपासणी करताना वाहन मालकाने वाहन चालविण्याचा परवाना मागितल्यावर तात्काळ वाहनाशी संबंधित कागदपत्रे दाखवावीत.

मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम ३, ४ अंतर्गत, सर्व वाहन चालकांकडे त्यांचा ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. कलम १८३, १८४, १८५ अंतर्गत वाहनाची वेगमर्यादा योग्य असणे आवश्यक आहे. मद्यपान करून वाहन चालवणे, निष्काळजीपणे वाहन चालवणे इत्यादी कलमांतर्गत दंड आणि शिक्षेची तरतूदही आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसIndiaभारत