टोयोटाची 'बेबी लँड क्रूझर'! जिम्नी नाही बरं का...! डिझाइन, रग्ड फीचर्स आणि ऑफ-रोडिंग क्षमता आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 12:13 IST2025-10-21T12:12:42+5:302025-10-21T12:13:24+5:30

Toyota Land Cruiser FJ:  'कॉम्पॅक्ट क्रूझर EV कॉन्सेप्ट' वरून प्रेरणा घेतलेल्या या 'बेबी लँड क्रूझर'मध्ये कोणते खास फीचर्स आहेत, ते पाहूया.

Toyota's 'Baby Land Cruiser'! Not a Jimny, right?! Design, rugged features and off-roading capabilities revealed in Japan Mobility Show 2025 | टोयोटाची 'बेबी लँड क्रूझर'! जिम्नी नाही बरं का...! डिझाइन, रग्ड फीचर्स आणि ऑफ-रोडिंग क्षमता आली समोर

टोयोटाची 'बेबी लँड क्रूझर'! जिम्नी नाही बरं का...! डिझाइन, रग्ड फीचर्स आणि ऑफ-रोडिंग क्षमता आली समोर

टोकियो: जपान मोबिलिटी शो २०२५ हे आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाईल जगतासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरले आहे. या शोमध्ये टोयोटाने आपल्या बहुप्रतिक्षित 2026 Toyota FJ Cruiser चे अनावरण केले आहे. टोयोटाने या दमदार एसयूव्हीद्वारे आपल्या 'एफजे क्रूझर' या लोकप्रिय नावाला पुन्हा जिवंत केले आहे.

 'कॉम्पॅक्ट क्रूझर EV कॉन्सेप्ट' वरून प्रेरणा घेतलेल्या या 'बेबी लँड क्रूझर'मध्ये कोणते खास फीचर्स आहेत, ते पाहूया.

नवीन एफजे क्रूझरला एक रग्ड आणि बॉक्सी डिझाइन देण्यात आले आहे, जे लगेच लक्ष वेधून घेते. ग्राहकांना दोन वेगळे फेसिया (मुखभाग) निवडण्याचा पर्याय मिळेल—एक गोल हेडलाईट्ससह आणि दुसरा आयताकृती हेडलाईट्ससह. यामध्ये चौरस आणि मस्क्युलर बॉडी पॅनल्स, जाड C-पिलर, टेलगेटवर असलेले स्पेअर व्हील आणि आकर्षक LED टेललाईट्स देण्यात आले आहेत.

याचबरोबर योटाने ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार बदल करण्यासाठी खास गोष्टी दिल्या आहेत. यानुसार बंपर्स सहज काढता येतात, तसेच स्नॉर्कल आणि कार्गो पॅनल सारख्या ॲक्सेसरीजचा पर्यायही उपलब्ध असणार आहे. ही एसयूव्ही जपानमध्ये २०२६ च्या मध्यापर्यंत लाँच होण्याची अपेक्षा आहे, त्यानंतर ती इतर आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये उपलब्ध होईल.

नवीन एफजे क्रूझरमध्ये दमदार २.७-लीटर ४-सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.

  • पॉवर: १६१ बीएचपी (bhp)

  • टॉर्क: सुमारे २४५ एनएम (Nm)

  • गिअरबॉक्स: ६-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स

  • ड्राइव्ह सिस्टीम: 4X4 ट्रान्सफर केस (हे फीचर्स एसयूव्हीला कोणत्याही ऑफ-रोड ट्रेलवर सहज चालवण्यास मदत करते).

आकारमान आणि ऑफ-रोड स्पेसिफिकेशन्स

२०२६ टोयोटा एफजे क्रूझर ही एसयूव्ही लँड क्रूझर २५० च्या प्लॅटफॉर्मवर आधारित आहे, परंतु तिचा व्हीलबेस २७० मिमीने छोटा आहे.

स्पेसिफिकेशनसाईज
लांबी (Length)४,५७५ मिमी
रुंदी (Width)१,८५५ मिमी
उंची (Height)१,९६० मिमी
ग्राउंड क्लिअरन्स२१५.३ मिमी
अप्रोच अँगल३१ अंश
टर्निंग रेडियस५.५ मीटर (ऑफ-रोडिंगसाठी अत्यंत सोयीस्कर)

Web Title : टोयोटा की 'बेबी लैंड क्रूजर' का अनावरण: डिजाइन, दमदार फीचर्स, ऑफ-रोडिंग क्षमता

Web Summary : टोयोटा ने कॉम्पैक्ट क्रूजर ईवी कॉन्सेप्ट से प्रेरित एक दमदार 'बेबी लैंड क्रूजर' के साथ एफजे क्रूजर को पुनर्जीवित किया। इसमें बॉक्सी डिजाइन, अनुकूलन योग्य सुविधाएँ और 4x4 ड्राइव के साथ 2.7-लीटर पेट्रोल इंजन है। जापान में 2026 के मध्य तक अपेक्षित, इसमें प्रभावशाली ऑफ-रोड विनिर्देश हैं।

Web Title : Toyota's 'Baby Land Cruiser' Unveiled: Design, Rugged Features, Off-Roading Ability

Web Summary : Toyota revives FJ Cruiser with a rugged 'Baby Land Cruiser,' inspired by the Compact Cruiser EV concept. It boasts a boxy design, customizable features, and a 2.7-liter petrol engine with 4x4 drive. Expected in Japan by mid-2026, it features impressive off-road specs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Toyotaटोयोटा