प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 17:47 IST2025-10-08T17:46:22+5:302025-10-08T17:47:52+5:30
टोयोटा किर्लोस्कर मोटरने त्यांच्या अत्यंत लोकप्रिय एसयूव्ही फॉर्च्यूनरच्या २०२५ लीडर एडिशनची नवीन आवृत्ती भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे.

प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
टोयोटा किर्लोस्कर मोटरने त्यांच्या अत्यंत लोकप्रिय एसयूव्ही फॉर्च्यूनरच्या २०२५ लीडर एडिशनची नवीन आवृत्ती भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. २०२४ मॉडेलला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर कंपनीने ही नवीन आवृत्ती बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. उत्कृष्ट लूक आणि प्रगत फीचर्समुळे ही एसयूव्ही ग्राहकांना आकर्षित करेल. या नवीन फॉर्च्यूनर लीडर एडिशनची बुकिंग ऑक्टोबर २०२५ च्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होईल. येत्या आठवड्यात या कारच्या किमती जाहीर केल्या जातील.
२०२५ फॉर्च्यूनर लीडर एडिशनला अधिक स्पोर्टी आणि प्रीमियम लूक देण्यात आला आहे. ड्युअल-टोन रूफ आणि ग्लॉसी ब्लॅक अलॉय व्हील्समुळे ही कार अधिक आकर्षक दिसते. कारच्या हुडवर एक नवीन 'लीडर एडिशन' बॅज जोडण्यात आला आहे, ज्यामुळे तिला एक वेगळी ओळख मिळते. ही एसयूव्ही अॅटिट्यूड ब्लॅक, सुपर व्हाइट, पर्ल व्हाइट आणि सिल्व्हर अशा चार रंगांमध्ये उपलब्ध असेल.
आलिशान आणि स्पोर्टी इंटिरियर
नवीन मॉडेलचे इंटिरियर देखील लक्झरी आणि स्पोर्टी टचसह डिझाइन करण्यात आले आहे. केबिनला आलिशान लूक देण्यासाठी ब्लॅक आणि मरून ड्युअल-टोन इंटिरियर थीम देण्यात आली आहे. सीट्स आणि डोअर ट्रिम्सवर ड्युअल-कलर फिनिश, फोल्डिंग ORVM, इल्युमिनेटेड स्कफ प्लेट्स आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
इंजिन आणि ट्रान्समिशन
नवीन फॉर्च्यूनर लीडर एडिशन पॉवरफुल इंजिनसह येते. यात २.८-लिटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन २०१ बीएचपी पॉवर आणि ५०० एनएम टॉर्क निर्माण करते. हे इंजिन मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दोन्ही पर्यायांसह उपलब्ध असेल.