Best Mileage CNG Car: सर्वाधिक मायलेज देणारी 'ही' स्वस्त सीएनजी कार, फक्त 2 रुपये प्रति किमी चालवण्याचा खर्च
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 23:12 IST2023-03-01T23:10:20+5:302023-03-01T23:12:38+5:30
Maruti Celerio CNG Price & Features : मारुती सेलेरियोची किंमत 5.35 लाख रुपयांपासून ते 7.13 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

Best Mileage CNG Car: सर्वाधिक मायलेज देणारी 'ही' स्वस्त सीएनजी कार, फक्त 2 रुपये प्रति किमी चालवण्याचा खर्च
नवी दिल्ली : सध्या भारतात सीएनजीवर चालणाऱ्या गाड्यांची मागणी वाढली आहे. मारुती सेलेरियो सीएनजी ही देशातील सर्वात मायलेज देणारी सीएनजी कार आहे. यामध्ये 1.0-लिटर पेट्रोल इंजिनयेते, जे पेट्रोलवर 67 पीएस पॉवर आणि 89 एनएम टॉर्क जनरेट करते तर सीएनजीवरील पॉवर आउटपुट 56.7पीएस/82 एनएम आहे, जे नियमित पेट्रोल व्हर्जनपेक्षा 8.5पीएस/7एनएम कमी आहे. सीएनजी व्हर्जनमध्ये 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते तर पेट्रोल व्हर्जनमध्ये 5-स्पीड मॅन्युअल (स्टँडर्ड) आणि 5-स्पीड एएमटीचा ऑप्शन मिळतो. हे सेगमेंट फर्स्ट ऑटोमॅटिक आइडल स्टार्ट-स्टॉप फीचर्ससह देखील येते.
मारुती सेलेरियोची किंमत 5.35 लाख रुपयांपासून ते 7.13 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही कार LXI, VXI, ZXI आणि ZXI+ या चार ट्रिम लेव्हलमध्ये येते. कारच्या VXI ट्रिममध्ये सीएनजीचा ऑप्शन उपलब्ध आहे. सीएनजीवर ही कार 35.6 किलोमीटरपर्यंत मायलेज देते. सीएनजीची किंमत 80 रुपये प्रतिकिलो (काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी जास्त) असेल तर मारुतीची ही कार चालवण्याचा खर्च किंमत जवळपास 2.2 रुपये प्रतिकिलोमीटर येईल.
मारुती सेलेरियोचे फीचर्स...
मारुती सेलेरियो ही 5 सीटर कार आहे. यामध्ये 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम (Android Auto आणि Apple CarPlay सह), इंजिन स्टार्ट/स्टॉप बटण, स्टीयरिंग व्हील माउंटेड ऑडिओ कंट्रोल्स, पॅसिव्ह कीलेस एंट्री, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, टर्न इंडिकेटर्स देण्यात आले आहेत. तसेच, इलेक्ट्रिक ORVM, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, हिल-होल्ड असिस्ट, EBD सह ABS आणि रिअर पार्किंग सेन्सर यांसारख्या फीचर्सह ऑफर करण्यात आली आहेत. ऑटो बाजारात टाटा टियागो आणि मारुती वॅगन आर यांसारख्या कारसोबत मारुती सेलेरिओची स्पर्धा आहे.