आकडे आले...! डिस्काऊंट देऊनही ओलाची विक्री वाढेना, टीव्हीएस नेहमीप्रमाणे १ नंबर, एथर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 17:39 IST2026-02-02T17:38:45+5:302026-02-02T17:39:46+5:30
Top 5 Electric Scooters India January 2026 : जानेवारी २०२६ मध्ये टीव्हीएसने ३४,४४० युनिट्स विकून नवा विक्रम प्रस्थापित केला. ओला इलेक्ट्रिकच्या विक्रीत ७०% घट. पहा अधिकृत Vahan विक्री आकडेवारी.

आकडे आले...! डिस्काऊंट देऊनही ओलाची विक्री वाढेना, टीव्हीएस नेहमीप्रमाणे १ नंबर, एथर...
भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाजारपेठेत जानेवारी २०२६ हा महिना ऐतिहासिक ठरला आहे. टीव्हीएस मोटर कंपनीने आपल्या 'iQube' आणि 'Orbiter' मॉडेलच्या जोरावर आतापर्यंतची सर्वोच्च मासिक विक्री नोंदवली आहे. विशेष म्हणजे, ओला इलेक्ट्रिकची विक्री कमालीची घटली असून ती आता टॉप ५ च्या शेवटच्या स्थानी पोहोचली आहे.
टीव्हीएसने जानेवारीत दररोज सरासरी १,१११ ई-स्कूटर्सची विक्री केली आहे. कंपनीचा बाजारपेठेतील हिस्सा आता २८% वर पोहोचला आहे. तर एकेकाळी बाजारावर राज्य करणाऱ्या ओला इलेक्ट्रिकचा मार्केट शेअर आता केवळ ६% उरला आहे. गेल्या वर्षीच्या २४,३३६ युनिट्सच्या तुलनेत यंदा केवळ ७,५०० युनिट्सची विक्री झाली आहे.
बजाज आणि एथर
बजाज ऑटोने चेतकच्या माध्यमातून २५,५२० युनिट्ससह दुसरे स्थान कायम ठेवले आहे, तर एथर एनर्जीने ६७% वाढीसह तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. जानेवारी २०२६ मध्ये भारतात एकूण १,२२,४७७ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्सची विक्री झाली आहे. यामाहा आता या क्षेत्रात उतरणार असून या कंपनीच्या दोन स्कूटर एकाचवेळी किती कमाल दाखवितात यावर पुढील काही महिन्यांचे नंबर अवलंबून असणार आहेत.
| क्रमांक | इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी | जानेवारी २०२६ विक्री (Units) | वार्षिक वाढ (YoY) |
| १ | TVS Motor | ३४,४४० | + ४३% |
| २ | Bajaj Auto | २५,५२० | + १९% |
| ३ | Ather Energy | २१,९०० | + ६७% |
| ४ | Hero Vida | १२,६०८ | + ७००% |
| ५ | Ola Electric | ७,५०० | - ७०% |