खेडेगावातील लोकांसाठी परवडणाऱ्या बाईक्स, किंमत ५५ हजारांपासून सुरू; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 18:22 IST2025-10-16T18:21:46+5:302025-10-16T18:22:53+5:30
Best Bikes: ग्रामीण भागातील ग्राहक बाईक निवडताना तिचा मायलेज, देखभाल खर्च, आराम आणि टिकाऊपणा या चार गोष्टींचा विचार करतात.

खेडेगावातील लोकांसाठी परवडणाऱ्या बाईक्स, किंमत ५५ हजारांपासून सुरू; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
ग्रामीण भारत आणि लहान शहरांमध्ये बाईक केवळ प्रवासाचे साधन नसून ती दैनंदिन जीवनातील एक अत्यावश्यक गरज आहे. ग्रामीण भागातील ग्राहक बाईक निवडताना तिचा मायलेज, देखभाल खर्च, आराम आणि टिकाऊपणा या चार गोष्टींचा विचार करतात, अशा ग्राहकांसाठी बाजारात काही बाईक उपलब्ध आहेत, ज्यांची किंमत ५५ हजारांपेक्षा कमी आहे.
१) हिरो स्प्लेंडर प्लस
हिरो स्प्लेंडर प्लस भारतातील सर्वाधिक विक्री होणारी बाईक आहे, आणि ती विशेषतः ग्रामीण भागात लोकप्रिय आहे. ७३,९०२ (एक्स-शोरूम) किंमत असलेली ही बाइक ९७.२ सीसी इंजिनसह ७३ किमी प्रति लिटर मायलेज देते. i3S स्टॉप-स्टार्ट टेक्नोलॉजीमुळे इंधनाची बचत होते.
२) बजाज प्लॅटिना १००
बजाज प्लॅटिना १०० उत्कृष्ट मायलेज आणि आरामदायी राईडसाठी प्रसिद्ध आहे. ६५,४०७ (एक्स-शोरूम) किंमत असलेली ही बाइक १०२ सीसी डीटीएस-आय इंजिनसह ८० किमी प्रति लिटर इंधन कार्यक्षमता देते. तिचे सस्पेंशन आणि लांब सीट खडतर मार्गांवरही आरामदायक राईड देतात. १०-लिटर इंधन टाकी क्षमतेसह येणारी ही बाईक एकदा टाकी फूल केल्यानंतर ८०० किलोमीटरचे अंतर कापते, असा कंपनीचा दावा आहे.
३) होंडा शाइन १००
होंडा शाइन १०० अशी बाईक आहे जी आरामदायक राईडसाठी आणि उत्तम कामगिरीसाठी आदर्श आहे. ६८,९९४ (एक्स-शोरूम) किंमत असलेली ही बाइक ९८.९८ सीसी इंजिनसह ६५ किमी प्रति लिटर इंधन कार्यक्षमता देते. ७.५ पीएस पॉवर आणि आयबीएस ब्रेकिंग सिस्टमसह येणारी ही बाईक सुरक्षिततेची खात्री देते. ही बाईक ग्रामीण भागांसाठी चांगला पर्याय आहे.
४) टीव्हीएस स्पोर्ट
टीव्हीएस स्पोर्ट तिच्या स्पोर्टी लूक आणि उत्कृष्ट मायलेजमुळे लहान शहरे आणि गावांमध्ये लोकप्रिय आहे. ५५,१०० (एक्स-शोरूम) किंमत असलेली ही बाइक १०९.७ सीसी इंजिनसह ७० किमी प्रति लिटर मायलेज देते.
५) टीव्हीएस रेडियन
टीव्हीएस रेडियन बाईकची किंमत ५५,१०० पासून सुरू होते आणि ६९ किमी प्रति लिटर मायलेज देते. १०९.७ सीसी एअर-कूल्ड इंजिनासह येणारी ही बाईक कामगिरी आणि कार्यक्षमतेचे संतुलन साधते. त्याचे स्टायलिश डिझाइन, ड्युअल-टोन सीट्स, डिजिटल-अॅनालॉग मीटर आणि एलईडी डीआरएलसारखी फीचर्स बाईकला आकर्षक बनवतात.