नवीन Pulsar N160 लाँच, कीमत फक्त 1.25 लाख रुपए, जबरदस्त आहेत फीचर्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 20:54 IST2022-06-22T20:53:24+5:302022-06-22T20:54:28+5:30
बजाज पल्सर N160 सिंगल चॅनल आणि डबल चॅनल ABS मध्ये उपलब्ध आहे.

नवीन Pulsar N160 लाँच, कीमत फक्त 1.25 लाख रुपए, जबरदस्त आहेत फीचर्स
बजाज ऑटोने आज भारतात पल्सर N160 लाँच केली आहे. हिची किंमत 125824 रुपए (एक्स-शोरूम, कोलकाता) असेल. पल्सर N250 आणि पल्सर F250 नंतर पल्सर लाइनअपमध्ये हे तिसरे व्हेरिअंट आहे. पल्सर N160 चे डिझाइन N250 प्रमाणे आहे. मोटरसायकलला एलईडी डेटाइम रनिंग लाइट्ससह एक एलईडी प्रोजेक्टर हेडलँप देण्यात आला आहे.
बजाज पल्सर N160 सिंगल चॅनल आणि डबल चॅनल ABS मध्ये उपलब्ध आहे. हिचे डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर देखील पल्सर N250 प्रमाणेच आहे. हिच्या पुढील भागात एक छोटी विंडस्क्रीन आहे. पल्सर N160 मध्ये ट्विन व्हर्टिकल एलईडी टेल लॅम्प्स, स्प्लिट ग्रॅब रेल्स आणि Y-आकाराचे अलॉय व्हिल्स जेखील आहे. असेच N250 लाही देण्यात आले आहे.
बजाज पल्सर N160 मध्ये 164.8cc, ऑइल-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. जे 16 PS एवढी पावर आणि 14.65 Nm चा पीक टॉर्क जनरेट करेल. ट्रांसमिशन ऑप्शनमध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स देखील देण्यात आला आहे.