शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

टेस्लाला मोठा झटका, VinFast बनली EV मार्केटची 'महाराणी'! आता असा आहे इलॉन मस्क यांच्या फ्यूचर प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 13:42 IST

टेस्ला कारच्या कमी विक्रीची महत्वाची कारणे काय...? असा आहे टेस्लाचा फ्यूचर प्लॅन...

जगातिक पातळीवर आपली  एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या टेस्ला या अमेरिकन कार कंपनीला भारतासारख्या खंडप्राय देशात अद्याप हवे तसे यश मिळालेले नाही. भारतीय बाजारात उतरल्यापासून टेस्लाला आतापर्यंत केवळ १५७ कार्सचीच विक्री करता आली आहे. भारताची क्षमता बघता टेस्लाची ही विक्री फारच कमी आहे. टेस्लाच्या तुलनेत, सप्टेंबर महिन्यात विक्री सुरू केलेल्या व्हिएतनामच्या 'विनफास्ट' (VinFast) ने केवळ नोव्हेंबर महिन्यातच ३६२ कार्सची विक्री केली. तर टेस्लाची कट्टर स्पर्धक असलेली BYD ही चिनी कंपनी दरमहा ५०० हून अधिक इलेक्ट्रिक कार्सची विक्री करते. 

महत्वाचे म्हणजे, सरकारी 'वाहन' पोर्टलच्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर महिन्यात टेस्लाने केवळ ४८ कार्सची डिलिव्हरी केली आहे. हे प्रमाण बीएमडब्ल्यू (BMW) आणि मर्सिडीज-बेंझ (Mercedes-Benz) सारख्या लक्झरी ब्रँड्सपेक्षा फारच कमी आहे. एकट्या बीएमडब्ल्यूचा विचार करता, या कंपनीने केवळ नोव्हेंबर महिन्यातच २६७ इलेक्ट्रिक कार्सची विक्री केली. 

टाटा मोटर्स पहिल्या स्थानावर - भारतातील इव्ही बाजारपेठेत सध्या टाटा मोटर्स ७३१५ कार्सच्या विक्रीसह पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर, एमजी, महिंद्रा, ह्युंदाई, किया आणि BYD यांसारख्या कंपन्यांचा क्रमांक लागतो. या यादीत टेस्ला थेट १०व्या क्रमांकावर आहे. हिचे मॉडेल Y अद्याप प्रीमियम सेगमेंटमध्ये स्वतःचे स्थान मजबूत करू शकलेले नाही.

टेस्ला कारच्या कमी विक्रीची महत्वाची कारणे -- महागड्या किमती - आयात केलेल्या कार्सवर भारतात मोठा कर लागतो, यामुळे किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर. - कंपनीचा भारतात कोणताही स्थानिक प्लांट नाही. - बाजारात उपलब्ध असलेले इतर स्वस्त पर्याय - अपुरे चार्जिंग नेटवर्क यांमुळे ग्राहक टेस्ला खरेदीपासून दूर असल्याचे दिसते.

असा आहे टेस्लाचा फ्यूचर प्लॅन - आपली स्थिती मजबूत करण्यासाठी टेस्लाने गुरुग्राममध्ये पहिले 'ऑल-इन-वन' सेंटरही सुरू केले आहे. येथे शोरूम, डिलिव्हरी आणि सर्व्हिस एकाच ठिकाणी मिळेल. कंपनी आता सुपरचार्जर नेटवर्क आणि डायरेक्ट सेल्स मॉडेलवर लक्ष केंद्रित करत आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : VinFast overtakes Tesla in India's EV market; Musk's future plans.

Web Summary : VinFast outsells Tesla in India. High taxes, lack of local production, and charging infrastructure hinder Tesla. Tata Motors leads EV sales, while Tesla plans expansion.
टॅग्स :Teslaटेस्लाelon muskएलन रीव्ह मस्कelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरElectric Carइलेक्ट्रिक कारTataटाटा