लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जुने वाहन मोडीत काढून त्याऐवजी नवे वाहन करणाऱ्यांना करसवलतची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तर दुसरीकडे जुन्या वाहनांवर आकारला जाणारा पर्यावरण कर दुप्पट करण्यात आला आहे. याशिवाय अन्य कोणताही नवीन कर न लावता सामान्यांना दिलासा दिला आहे.
बीएस-४ व त्याखालील वायू प्रदूषणाची मानके असलेल्या खासगी वाहनांवरील पर्यावरण करात वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात केली आहे.
वाहन करामध्ये ३० टक्के सूट जुन्या दुचाकी वाहनांवरील पर्यावरण कर २ हजार रुपयांवरून वाढवून ४ हजार रुपये करण्यात आला आहे. पेट्रोलवरील हलक्या मोटार वाहनांसाठीचा म्हणजे कारसाठीचा पर्यावरण कर ३ हजार रुपयांवरून ६ हजार रुपये करण्यात आला आहे. तर डिझेल कारवरील कर साडेतीन हजार रुपयांवरून ७ हजार रुपये करण्यात आला आहे. बीएस-४ व त्यावरील प्रदूषणाची मानके असलेले वाहन मोडीत काढून नवीन वाहन खरेदी करताना मोटार वाहन करामध्ये १६ टक्के व बीएस-३ व त्याखालील प्रदूषणाची मानके असलेले वाहन मोडीत काढून नवीन वाहन खरेदी करताना मोटार वाहन करामध्ये ३० टक्के सूट देण्यात येणार आहे.
मुद्रांक चुकवल्यास लाखाचा दंडदस्त नोंदणी करताना मुद्रांक शुल्क वाचवण्यासाठी कमी मुद्रांकावर दस्त नोंदणी होते. या प्रकरांमुळे महसूलाचे मोठ्या प्रमाणात नुकसात होते. त्यामुळे महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम ५९, ६०, ६३ अ व ६८ अ मध्ये कमी मुद्रांकावर दस्त नोंदणी केल्यास होणाऱ्या दंडात्मक तरतुदींची फेररचना करण्यात आली आहे.कमी मुद्रांकावर दस्त नोंदणी केल्यास अपराधसिद्धीनंतर सक्तमजुरी व दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. सदर दंडाच्या रकमेची फेररचना करून ५ हजार रुपयांवरून हा दंड एक लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचे अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आले आहे. यामुळे कमी मुद्रांक शुल्क भरून दस्त नोंदणी करण्याचे प्रमाण नियंत्रणात येऊन राज्याच्या महसूलात वाढ होण्याची अपेक्षा आहे.
Web Summary : Maharashtra offers tax benefits for new vehicles purchased after scrapping old ones. Environment tax on old vehicles doubles. Stamp duty evasion penalty increased to ₹1 lakh, aiming to boost state revenue.
Web Summary : महाराष्ट्र पुराने वाहनों को हटाने पर कर लाभ प्रदान करता है। पुराने वाहनों पर पर्यावरण कर दोगुना। स्टाम्प शुल्क चोरी पर जुर्माना बढ़ाकर ₹1 लाख, राज्य राजस्व को बढ़ावा देने का लक्ष्य।