₹2 लाखांच्या डाउन पेमेंटवर Tata Sierra घेतल्यावर EMI किती लागेल? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 15:47 IST2026-01-18T15:46:06+5:302026-01-18T15:47:43+5:30

Tata Sierra on EMI: लॉन्च होताच हजारो ग्राहकांनी Tata Sierra बुक केली आहे.

Tata Sierra on EMI: How much will be the EMI after buying a Tata Sierra with a down payment of ₹2 lakh? Know | ₹2 लाखांच्या डाउन पेमेंटवर Tata Sierra घेतल्यावर EMI किती लागेल? जाणून घ्या...

₹2 लाखांच्या डाउन पेमेंटवर Tata Sierra घेतल्यावर EMI किती लागेल? जाणून घ्या...

Tata Sierra on EMI: भारतीय SUV बाजारात टाटा मोटर्सची बहुप्रतिक्षित टाटा सिएरा ग्राहकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. आधुनिक डिझाइन, दमदार इंजिन आणि स्पर्धात्मक किमतीमुळे ही SUV चर्चेत आहे. लॉन्च होताच हजारो ग्राहकांनी ही एसयूव्ही बुक केली, यावरुनच या गाडीची लोकप्रियता कळते. तुम्हीही सिएरा खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर किती डाउन पेमेंट आणि किती EMI लागेल, हे जाणून घ्या.

टाटा सिएराची किंमत...

टाटा सिएराच्या किंमती व्हेरिएंटनुसार बदलतात

  • बेस व्हेरिएंट (एक्स-शोरूम) : ₹11.49 लाख
  • टॉप व्हेरिएंट (एक्स-शोरूम) : ₹18.49 लाख

दिल्लीमध्ये Tata Sierra Smart Plus 1.5 पेट्रोल (बेस मॉडेल) खरेदी केल्यास, ऑन-रोड किंमत सुमारे ₹13.44 लाख आहे. (या किमतीत RTO, विमा आणि इतर शुल्कांचा समावेश आहे. शहरानुसार किंमतीत फरक असू शकतो.)

फक्त 2 लाख डाउन पेमेंटवर SUV घरी आणा

जर तुम्ही टाटा सिएराचे बेस मॉडेल फायनान्सवर घेतले, तर... 

डाउन पेमेंट : ₹2 लाख 

लोन रक्कम : सुमारे ₹11.44 लाख

लोन कालावधी : 5 वर्षे (60 महिने)

व्याजदर : 9% (सरासरी)

अंदाजे मासिक EMI : ₹23,751

(बँक, व्याजदर आणि प्रोसेसिंग चार्जनुसार EMI थोडीफार बदलू शकते.)

सिएराचे इंजिन आणि मायलेज

टाटा सिएरामध्ये 1.5-लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.

पॉवर : 105 bhp

टॉर्क : 145 Nm

गिअरबॉक्स : 6-स्पीड मॅन्युअल

ही SUV शहरात स्मूथ ड्रायव्हिंग अनुभव देते, तर हायवेवरही आरामदायी प्रवास शक्य करते. उंच ड्रायव्हिंग पोस्चरमुळे सिएरा एक “खरी SUV” असल्याचा फील देते.

मायलेज : 18.2 kmpl (कंपनी दावा)

याशिवाय टाटा सिएरामध्ये टर्बो-पेट्रोल आणि टर्बो-डिझेल इंजिनचे पर्यायही उपलब्ध आहेत.

कोणत्या गाड्यांना देते टक्कर?

भारतीय बाजारात टाटा सिएराची थेट स्पर्धा Hyundai Creta, Kia Seltos, Renault Duster शी आहे. किंमत, मायलेज आणि ब्रँड व्हॅल्यूच्या जोरावर टाटा सिएरा या सेगमेंटमध्ये मजबूत दावेदारी सादर करत आहे.

Web Title : टाटा सिएरा ईएमआई: डाउन पेमेंट, लोन विवरण और माइलेज जानिए।

Web Summary : टाटा सिएरा एसयूवी अपने डिजाइन और प्रतिस्पर्धी कीमत के साथ लोकप्रियता हासिल कर रही है। ₹2 लाख के डाउन पेमेंट पर, बेस मॉडल के लिए ईएमआई 9% ब्याज पर 5 साल के लोन के लिए लगभग ₹23,751 हो सकती है। यह हुंडई क्रेटा और किआ सेल्टोस को टक्कर देती है।

Web Title : Tata Sierra EMI: Down payment, loan details, and mileage explored.

Web Summary : Tata Sierra SUV is gaining popularity with its design and competitive price. With a ₹2 lakh down payment, the EMI for the base model could be around ₹23,751 for a 5-year loan at 9% interest. It rivals Hyundai Creta and Kia Seltos.