Tata Sierra आता नव्या रुपता! मिळणार ट्रिपल स्क्रीन सेटअप अन् अॅडव्हॉन्स फीचर्स, किती असेल किंमत? जाणून घ्या सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 14:36 IST2025-11-16T14:36:27+5:302025-11-16T14:36:51+5:30
भारतातील रस्त्यांवर ९० च्या दशकात अधिराज्य गाजवणारी टाटा मोटर्सची आयकॉनिक एसयूव्ही 'सिएरा' आता पुन्हा एकदा नव्या आणि आधुनिक स्वरुपात ...

Tata Sierra आता नव्या रुपता! मिळणार ट्रिपल स्क्रीन सेटअप अन् अॅडव्हॉन्स फीचर्स, किती असेल किंमत? जाणून घ्या सविस्तर
भारतातील रस्त्यांवर ९० च्या दशकात अधिराज्य गाजवणारी टाटा मोटर्सची आयकॉनिक एसयूव्ही 'सिएरा' आता पुन्हा एकदा नव्या आणि आधुनिक स्वरुपात परतत आहे. कंपनीने याची अधिकृत घोषणा केली असून २५ नोव्हेंबर २०२५ रोजी ही एसयूव्ही लॉन्च होणार आहे. या एसयूव्हीमध्ये १२.३ इंचांचे इन्फोटेनमेंट स्क्रीन, ट्रिपल स्क्रीन सेटअप, लेव्हल-२ ADAS देण्यात आले आहे. या कारची किंमत 11 ते 20 लाख रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे.
ही नवीन सिएरा डिझाइनच्या बाबतीत काहीशी जुन्या मॉडेल प्रमाणेच आहे. मात्र, तिला आधुनिक टच देण्यात आला आहे. फ्रंटमध्ये व्हर्टिकल LED हेडलॅम्प्स आणि ग्लॉस ब्लॅक ग्रिल आणि सिल्व्हर स्किड प्लेट यांमुळे हिला बोल्ड लूक मिळतो. १८-१९ इंचाचे अलॉय व्हील्स, फ्लश डोअर हँडल्स आणि ब्लॅक C-पिलरमुळे हिचे फ्लोटिंग रूफ डिझाइन अत्यंत प्रीमियम वाटते. सुमारे ४.३ मीटर लांबीची ही एसयूव्ही कुटुंबासाठी एक योग्य पर्याय ठरू शकते.
महत्वाचे म्हणजे, या एसयूव्हीमध्ये ट्रिपल स्क्रीन सेटअप, हे मुख्य आकर्षण आहे. यात ड्रायव्हर डिस्प्ले, मोठा टचस्क्रीन आणि प्रवाशांसाठी स्वतंत्र स्क्रीन देण्यात आली आहे. १२.३ इंच इन्फोटेनमेंट सिस्टिमसह वायरलेस कनेक्टिव्हिटी, ड्युअल-झोन AC, व्हेंटिलेटेड सीट्स, पॅनोरमिक सनरूफ आणि वायरलेस चार्जिंग यांसारखे लक्झरी फीचर्सदेखील देण्यात आले आहेत.
टाटा सिएरा पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक अशा तीन पर्यायांमध्ये उपलब्ध होणार आहे. पेट्रोलमध्ये १.५ लीटर टर्बो इंजिन १७० हॉर्सपावरची पॉवर देईल, तर डिझेलमध्ये पर्यायात ११८ हॉर्सपावरची क्षमता मिळेल. महत्वाचे म्हणजे, या कारमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक असे दोन्ही गिअरबॉक्स उपलब्ध असतील.
कंपनीच्या माहितीनुसार, पेट्रोल आणि डिझेल व्हर्जन 15 ते 20 kmpl एवढे मायलेज देऊ शकते. ही एसयूव्ही बाजारात क्रेटा, सेल्टॉस आणि स्कॉर्पियो-N सारख्या कारला टक्कर देईल. सुरक्षेच्या दृष्टीने विचार करता, या कारमध्ये ६ एअरबॅग्ज, ३६०° कॅमेरा, लेव्हल-२ ADAS, ABS आणि हिल कंट्रोल यांसारखे फीचर्स देण्यात आले आहे.