नव्या रुपात परततेय Tata Sierra! पेट्रोल, डिझेल, EV व्हर्जनमध्ये होणार लाँच; थेट Creta, Seltos सारख्या कारला देणार टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 16:33 IST2025-10-11T16:32:33+5:302025-10-11T16:33:24+5:30
ही कार 1990 च्या दशकात ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली होती...

नव्या रुपात परततेय Tata Sierra! पेट्रोल, डिझेल, EV व्हर्जनमध्ये होणार लाँच; थेट Creta, Seltos सारख्या कारला देणार टक्कर
टाटा मोटर्स आपली आयकॉनिक आणि क्लासिक SUV Tata Sierra पुन्हा एकदा भारतीय बाजारात सादर करण्याच्या तयारीत आहे. ही कार 1990 च्या दशकात ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली होती. आता ती आधुनिक डिझाइन आणि मल्टी-पावरट्रेन तंत्रज्ञानासह नव्या रुपात येत आहे. यासंदर्भात खुद्द टाटा मोटर्सनेच पुष्टी केली आहे की, 2030 पर्यंत सात नवीन मॉडेल्स लॉन्च केली जातील, यापैकी पहिली एसयूव्ही टाटा सिएरा 2025 असेल, असे कंपनीने म्हटले आहे. ही कार ह्युंदाई क्रेटा, किआ सेल्टोस, मारुती ग्रँड विटारा आणि मारुती व्हिक्टोरिस यांना थेट टक्कर देईल.
तीन पर्यायांमध्ये असेल सिएरा -
ही नवीन सिएरा विविध इंजिन पर्यायांसह उपलब्ध असेल. यात 1.5-लिटर नॅच्युरली-एस्पिरेटेड पेट्रोल, 1.5-लिटर टर्बो पेट्रोल (TGDi) आणि 2.0-लिटर क्रायोटेक डिझेल इंजनचा समावेश आहे. याशिवाय, इलेक्ट्रिक व्हर्जन (EV) देखील येणार असून, त्यात 65kWh आणि 75kWh बॅटरी पॅक असतील. पेट्रोल आणि डिझेल व्हर्जन नोव्हेंबर 2025 मध्ये, तर इलेक्ट्रिक व्हर्जन जानेवारी 2025 मध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे.
असे असेल इंजिन -
या कारसोबत देण्यात येणारे, 1.5-लिटर टर्बो पेट्रोल इंजन 170 बीएचपी पॉवर आणि 280 एनएम टॉर्क देईल, तर डिझेल इंजिन 170 बीएचपी आणि 350 एनएम टॉर्क प्रदान करेल. दोन्ही इंजिन्सना 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय मिळेल. इलेक्ट्रिक व्हर्जनची रेंज 500 किमीपेक्षा जास्त असेल, आणि 75kWh बॅटरीसह AWD पर्याय उपलब्ध असेल.
डिझाइन आणि वैशिष्ट्ये
नवीन Sierra चे डिझाइन साधारणपणे, जुन्या क्लासिक लूक प्रमाणेच आहे. मात्र ते आधुनिक आणि फ्युचरिस्टिक आहे. यात LED DRLs, प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, पॅनोरमिक सनरूफ, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मोठे टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, कनेक्टेड कार तंत्रज्ञान, ADAS, प्रीमियम इंटीरियर आणि प्रशस्त सीटिंग यासारखी वैशिष्ट्ये असतील.