CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 16:20 IST2026-04-05T16:17:48+5:302026-04-05T16:20:27+5:30

Safety Car: देशातील सर्वात परवडणारी टाटाची सीएनजी कार टाटा पंचला क्रॅश टेस्टमध्ये ५ स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे.

Tata Punch: Indias Most Affordable CNG Car Scores 5-Star Safety Rating in Crash Test | CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!

CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!

सुरक्षित आणि परवडणारी कार शोधणाऱ्यांसाठी टाटा पंच सीएनजी कार हा एक उत्तम पर्याय आहे. कमी बजेटमध्ये उपलब्ध असलेल्या या कारने क्रॅश टेस्टमध्ये ५ स्टार सेफ्टी रेटिंग मिळवत ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे. सुरक्षितता, कमी खर्च आणि चांगली परफॉर्मन्स यामुळे या कारला ग्राहकांकडून मोठी पसंती मिळत आहे. विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी हा एक आकर्षक पर्याय ठरत आहे.

भारत एनसीएपीद्वारे घेण्यात आलेल्यात क्रॅश टेस्टमध्ये टाटा पंचला ५-स्टार रेटिंग मिळाले आहे. ही कार भारतातील सर्वात परवडणाऱ्या आणि सुरक्षित सीएनजी कारपैकी एक ठरली आहे. शिवाय, दैनंदिन वापरासाठी ही कार अत्यंत किफायतशीर मानली जाते. पेट्रोलच्या तुलनेत सीएनजीवर चालणाऱ्या गाड्या अधिक परवडतात. ज्यामुळे चालकांचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होतो.

टाटा पंच सीएनजी: खासियत

या कारमध्ये ग्राहकांना स्टायलिश लूक आणि दमदार फीचर्स मिळतात. ही कार दिसायला एखाद्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीसारखे दिसते. शिवाय या कारमध्ये ग्राहकांना टचस्क्रीन इंटरफेस, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, कनेक्टेड कार यांसारखे आधुनिख फीचर्स मिळत आहे. त्यामुळे कमी बजेट असलेल्या ग्राहकांसाठी ही कार चांगला पर्याय ठरू शकते.

टाटा पंच सीएनजी: किंमत

या कारची सुरुवातीची 'एक्स-शोरूम' किंमत साधारणपणे ₹५ ते ₹६ लाख इतकी आहे; अर्थात, कारच्या विशिष्ट मॉडेलनुसार ही किंमत बदलू शकते. याच कारणामुळे, मर्यादित बजेटमध्ये एखादी सुरक्षित, मजबूत सीएनजी कार खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी सुवर्णसंधी आहे.

टाटा पंच सीएनजी: सुरक्षित कार

क्रॅश टेस्टमध्ये या कारने उत्कृष्ट कामगिरी केली असून यात उच्च दर्जाचे सेफ्टी फीचर्स असल्याचे असल्याचे सिद्ध झाले. अपघातातही कुटुंब सुरक्षित राहू शकते. क्रॅश टेस्टनंतर बॉडी स्ट्रक्चर मजबूत असल्याचे आढळले. यामुळे ही कार ग्राहकांसाठी अत्यंत सुरक्षित कार असल्याचे कंपनीने दावा केला आहे.

Web Title : टाटा पंच सीएनजी: किफायती, सुरक्षित सीएनजी कार, 5-स्टार रेटिंग!

Web Summary : टाटा पंच सीएनजी सुरक्षा और किफ़ायत का संगम है। 5-स्टार सुरक्षा रेटिंग, आकर्षक डिजाइन, आधुनिक फीचर्स और कम लागत इसे बजट के अनुकूल परिवारों के लिए आदर्श बनाते हैं। इसकी एक्स-शोरूम कीमत ₹5-₹6 लाख से शुरू होती है, जो इसे एक सुरक्षित और किफायती सीएनजी कार बनाती है।

Web Title : Tata Punch CNG: Affordable, safe CNG car with 5-star rating.

Web Summary : Tata Punch CNG offers safety and affordability. With a 5-star safety rating, stylish design, modern features, and low running costs, it’s ideal for budget-conscious families. Its ex-showroom price starts from ₹5-₹6 lakh, making it a top choice for a safe and economical CNG car.