शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
5
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
6
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
7
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
8
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
9
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
10
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
11
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
12
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
13
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
14
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
15
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
16
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
17
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

दणकट टाटा नेक्‍सॉनचे नवे व्हेरिअंट आले; जाणून घ्या किंमत अन् खास फिचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2020 3:42 PM

Tata Nexon XM(S) व्‍हेरिअंटमध्‍ये नेक्‍सॉन एक्‍सएमची आधीची वैशिष्‍ट्ये कायम ठेवण्‍यात आली आहेत.

मुंबई : टाटा मोटर्स या भारताच्‍या आघाडीच्‍या ऑटोमोटिव्‍ह ब्रॅण्‍डने आज टाटा नेक्‍सॉनचे एक्‍सएम(एस) व्‍हेरिअंट लाँच केले. ग्राहकांच्‍या वाढत्‍या मागण्‍यांची पूर्तता करण्‍याच्‍या, तसेच प्रिमिअम वैशिष्‍ट्ये अधिक किफायतशीर दरामध्‍ये उपलब्‍ध करून देण्‍याच्‍या प्रयत्‍नामध्‍ये कंपनीने आता ८.३६ लाख रूपयांपासून (एक्‍स-शोरूम दिल्‍ली) इलेक्ट्रिक सनरूफ असलेली एक्‍सएम(एस) व्‍हेरिअन्ट आणले आहे. 

इलेक्ट्रिक सनरूफसह एक्‍सएम(एस) व्‍हेरिअन्टमध्‍ये ऑटोमॅटिक हेडलॅम्‍प्‍स, रेन सेन्सिंग वायपर्स व स्टिअरिंग माऊंटेड कंट्रोल्‍स अशी वैशिष्‍ट्ये आहेत. या व्‍हेरिअंटमध्‍ये नेक्‍सॉन एक्‍सएमची आधीची वैशिष्‍ट्ये कायम ठेवण्‍यात आली आहेत. यामध्ये इलेक्‍ट्रॉनिक स्‍टेबिलिटी प्रोग्राम, एलईडी डीआरएलसह प्रोजेक्‍टर हेडलॅम्‍प्‍स, ड्रायव्‍हर व को-ड्रायव्‍हर एअरबॅग्‍ज, हिल होल्‍ड कंट्रोल, हार्मनची कनेक्‍ट नेक्‍स्‍ट इन्‍फोटेन्‍मेंट सिस्‍टम आणि मल्‍टी-ड्राइव्‍ह मोड्स (इको, सिटी व स्‍पोर्ट). यासोबत अनेक अत्‍याधुनिक वैशिष्‍ट्ये देण्यात आली आहेत. 

पेट्रोल व डिझेल व्‍हेरिअन्टमध्‍ये नेक्‍सॉन मॅन्‍युअल व एएमटी या दोन्ही ट्रान्‍समिशनमध्ये येईल. सविस्‍तर किंमती खालीलप्रमाणे आहेत.  

                                                 पेट्रोल                     डिझेल एक्‍सएम (एस) मॅन्‍युअल     ८.३६ लाख रूपये    ९.७० लाख रूपये एक्‍सएमए (एस) एएमटी     ८.९६ लाख रूपये     १०.३० लाख रूपये 

टाटाच्या या नेक्सॉन कॉम्पॅक्ट एसयुव्हीचा मुकाबला ह्युंदाई व्हेन्यू, मारुती सुझुकी ब्रिझा, महिंद्रा XUV300, फोर्ड इकोस्पोर्ट आणि कियाच्या सोनेटसोबत होणार आहे. टाटा नेक्सॉनच्या ड्यूल-क्लच ट्रांसमिशन (DCT) वरही काम सुरु आहे. येत्या काळात हे मॉडेलही लाँच केले जाईल. 

Nexon EV आधीपासूनच बाजारात

टाटानं  Nexon EV लॉन्च केली आहे. या कारची किंमत 13.99 लाखांपासून सुरू होईल. कॉम्पॅक्ट एसयूव्ही प्रकारातली ही टाटाची पहिली कार असून देशातली सर्वात स्वस्त एसयूव्ही आहे. Tata Nexon Electric तीन व्हेरिंयटमध्ये ( XM, XZ+ आणि XZ+ LUX) उपलब्ध आहे. Tata Nexon ची स्पर्धा एमजी ZS EV आणि ह्युंदाई कोनाशी होईल. मात्र या दोन्ही कारची किंमत नेक्सॉनपेक्षा जास्त आहे. टाटा नेक्सॉनच्या ईव्हीमध्ये 30.2 kWh लिथियम-आयनची बॅटरी देण्यात आली. ही बॅटरी कारच्या फ्लोरखाली आहे. पूरपरिस्थितीतही ही बॅटरी सुरक्षित राहील, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर नेक्सॉन 312 किलोमीटर अंतर कापेल. शून्य ते 100 किलोमीटर प्रति तास इतका वेग घेण्यासाठी नेक्सॉनला 9.9 सेकंद लागतात. नेक्सॉनला स्टँडर्ड 15A AC चार्जरनं 20 टक्क्यांहून 100 टक्क्यांपर्यंत चार्ज करण्यासाठी 8 तासांचा कालावधी लागतो. तर फास्ट चार्जरनं नेक्सॉनची बॅटरी ० ते ८० टक्क्यांपर्यंत ६० मिनिटांमध्ये चार्ज होते. 

 

टॅग्स :TataटाटाMaruti Suzukiमारुती सुझुकी