टाटा मोटर्समध्ये दोन उभे भाग पाडले; प्रवासी वाहन आणि व्यावसायिक वाहनांचे व्यवसाय वेगळे झाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 13:22 IST2025-09-28T13:21:26+5:302025-09-28T13:22:24+5:30
Tata Motors split, demerger: एका महिन्यापूर्वी NCLT ने कंपनीच्या दोन्ही युनिट्सना वेगळे करण्यास मान्यता दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

टाटा मोटर्समध्ये दोन उभे भाग पाडले; प्रवासी वाहन आणि व्यावसायिक वाहनांचे व्यवसाय वेगळे झाले...
टाटा मोटर्सने आपल्या प्रवासी वाहन (PV) आणि व्यावसायिक वाहन (CV) व्यवसायांना वेगळे करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे. यामुळे व्यवस्थापनात मोठे फेरबदल जाहीर केले. कंपनीने गिरीश वाघ यांना व्यावसायिक व्यवसायाचे आणि शैलेश चंद्रा यांना प्रवासी वाहन व्यवसायाचे प्रमुख नेमले आहे.
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अॅक्च्युएटर फॉल्टी
हा महत्त्वपूर्ण निर्णय एका महिन्यापूर्वी NCLT ने कंपनीच्या दोन्ही युनिट्सना वेगळे करण्यास मान्यता दिल्यानंतर घेण्यात आला. नवीन व्यवस्थेनुसार, येत्या १ ऑक्टोबरपासून हे बदल लागू होणार आहेत. शैलेश चंद्रा हे टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सचे (TPV) व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून जबाबदारी स्वीकारतील. त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल. ते टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे (TPEM) एमडी म्हणूनही आपले पद कायम ठेवतील.
तर गिरीश वाघ, जे सध्या टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक आहेत, ते १ ऑक्टोबरपासून आपल्या पदाचा राजीनामा देऊन 'TML कमर्शियल व्हेइकल्स' (TMLCV) या नवीन कंपनीच्या बोर्डात सामील होतील. वाघ येथे एमडी आणि सीईओची भूमिका बजावतील. याचबरोबर ग्रुप सीएफओ (CFO) पीबी बालाजी यांनी १७ नोव्हेंबरपासून प्रभावी होणाऱ्या आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. ते त्यानंतर यूकेमधील जॅग्वार लँड रोव्हर (JLR) चे सीईओ म्हणून पदभार स्वीकारतील. त्यांच्या जागी, धिमन गुप्ता हे १७ नोव्हेंबरपासून टाटा मोटर्सचे नवे सीएफओ असणार आहेत.
रजिस्ट्रार ऑफ कंपनीज (ROC), मुंबईमध्ये नोंदणी झाल्यावरच 'डिमर्जर' योजना अधिकृतपणे लागू होईल. कंपनी लवकरच या योजनेची प्रभावी तारीख आणि 'रेकॉर्ड तारीख' जाहीर करेल, जेणेकरून भागधारकांना त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक एका शेअरमागे TMLCV चा एक शेअर मिळणार आहे.