TATA कार्स खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डिसेंबर महिन्यात मिळणार गाड्यांवर बंपर सूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 13:14 IST2021-12-04T13:13:53+5:302021-12-04T13:14:22+5:30
Tata Motors नं २०२१ च्या अखेरपर्यंत आपल्या काही ठराविक गाड्यांवर मोठी सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.

TATA कार्स खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डिसेंबर महिन्यात मिळणार गाड्यांवर बंपर सूट
टाटा मोटर्सनं (TATA Motors) नं डिसेंबर महिन्यात आपल्या ठराविक गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स देण्याची घोषणा केली आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत टाटा टियागो आणि टिगोर या गाड्यांवर सूट देण्यात येणार आहे. या गाड्यांवर रोख फायदा मिळणार आहे परंतु अन्य गाड्यांवर काही अन्य ऑफर्स मिळू शकतात. टाटा टियागोवर एकूण २५ हजार रूपयांचा लाऊ मिळणार आहे. तर यामध्ये १० हजारांपर्यंत कॅश डिस्काऊंट आणि १५ हजारांपर्यंत एक्सचेंज बोनस देण्यात येईल. टाटा टियागोच्या XT आणि XTO या गाड्यांवर ही ऑफर मिळेल. बाती व्हेरिअंट्सवर १० हजारांचा एक्सजेंज बोनस देण्यात येईल.
टाटा टिगोरवर एकूण २५ हजार रूपयांचा लाभ मिळेल. यात १० हजारांपर्यंत कॅश डिस्काऊंट आमि १५ हजारांपर्यंतचा एक्सजेंज बोनस मिळेल. टिगोरच्या सर्व व्हेरिअंट्सवर ही ऑफर मिळणार आहे. दुसरीकडे टाटा नेक्सॉनवर केवळ १५ हजार रूपयांचं एक्सचेंज बोनस देण्यात येईल. एसयुव्हीच्या पेट्रोल व्हेरिअंटवर कोणताही लाभ देण्यात येत नाही. टाटा नेक्सॉन ईव्हीनंही १५ हजारांपर्यंत एक्सचेंज बोनस दिला आहे. ही ऑफर SUV च्या डार्क एडिशनवर मात्र मिळणार नाही.
हॅरिअरवर ४० हजारांचा एक्सचेंज बोनस
टाटाच्या मिडसाईज ५ सीटर एसयुव्ही हॅरिअरवर ४० हजार रूपयांचा एक्सचेंज बोनस देण्यात येणार आहे. जर याचं डार्क एडिशन खरेदी करणार असाल तर या बोनसची रक्कम अर्धी होणार आहे. तर दुसरीकडे सफारीवरही ४० हजारांचा एक्सचेंज बोनस देण्यात आला आहे. तर गोल्ड एडिशनवर कोणतीही ऑफर देण्यात आली नाही. दरम्यान, राज्य ठिकाण आणि डिलरशिपकडून कंपनीद्वारे देण्यात येणाऱ्या या ऑफर्समध्ये बदल होऊ शकतात.