टाटा मोटर्सची Tiagoची नवी क्रॉस कार लाँच; पाहा काय केले बदल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 15:06 IST2018-09-12T15:04:41+5:302018-09-12T15:06:50+5:30
एका वर्षातच टियागोने एक लाखाचा टप्पा ओलांडला होता. यामुळे टाटाने टियागोचा सेदान टिगॉर कार बाजारात आणली होती.

टाटा मोटर्सची Tiagoची नवी क्रॉस कार लाँच; पाहा काय केले बदल...
मुंबई : टाटा मोटर्सला नवी ओळख देणाऱ्या टियागोचे क्रॉस मॉडेल आज लाँच करण्यात आले. Tata Tiago NRG असे याचे नाव असून सुरुवातीच्या मॉडेलची किंमत 5.5 लाख तर टॉप मॉडेलची किंमत एक्स-शोरूम 6.32 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
छोट्या कारच्या स्पर्धेत बाजारात मागे पडलेल्या टाटा मोटर्सला टियागोने नवसंजिवनी दिली होती. एका वर्षातच टियागोने एक लाखाचा टप्पा ओलांडला होता. यामुळे टाटाने टियागोचा सेदान टिगॉर कार बाजारात आणली होती. आता मारुतीच्या सेलेरिओची स्पर्धा करण्यासाठी टाटाने टियागोचे एनआरजी रुप बाजारात आणले आहे.
एनआरजीमध्ये काही बाहेरून बलद करण्यात आले आहेत. ही कार टियागोपेक्षा काही जास्त लांब, रुंद आणि उंच आहे. मात्र, या कारचा प्लॅटफॉर्म सारखाच आहे. एनआरजीचा ग्राऊंड क्लिअरंस वाढवून 180 मीमी करण्यात आला आहे. कारमध्ये क्रॉस सारखे काळ्या रंगाचे प्लॅस्टिक लावण्यात आले आहे.
मागच्या बंपरला फॉक्स स्किड प्लेट आहे. यामध्ये काळ्या रंगाची रुफ रेल्स मिळेल. याशिवाय ग्रील, ओआरव्हीएमस रुफ माऊंटेड स्पॉइलरलाही काळा रंग देण्यात आला आहे. केबिनमध्येही काळा रंग दिसेल. Tiago NRG मध्ये 14 इंचाचे अलॉय व्हील्स दिले आहेत.
टॉप व्हेरिअंट्समध्ये स्टीअरिंग माउंटेड कंट्रोल्स, ब्लूटूथ, स्मार्टफोन इंटिग्रेशन, रियर पार्किंग सेंसर्स देण्यात आले आहेत.
इंजिन क्षमता : टियागोसारखेच या कारमध्येही पेट्रोल-डिझेल चे पर्याय उपलब्ध आहेत. पेट्रोलमध्ये 1.2 लीटर, 3 सिलिंडर Revotron इंजिन देण्यात आले आहे, जे 84 बीएचपी ताकद निर्माण करते. तर डिझेलमध्ये 1.05 लीटर, 3 सिलिंडर रिव्होटॉर्क इंजिन देण्यात आले असून ते 69 बीएचपी ताकद प्रदान करते. या इंजिनांना 5 स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स देण्यात आला आहे.