टाटाने 77 टक्के बाजारपेठ काबीज केली; Tata Nexon EV बनली सर्वाधिक खपाची इलेक्ट्रीक कार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 06:03 PM2021-05-25T18:03:04+5:302021-05-25T18:04:42+5:30

Tata Nexon EV sale: Jato Dynamics ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार Nexon EV च्या  525 कार गेल्या महिन्यात विकल्या गेल्या आहेत. यानंतर MG ZS EV चा नंबर लागत असून या एसयुव्हीच्या 156 कार विकल्या गेल्या आहेत.

Tata captures 77 percent EV market; Nexon EV was India's best-selling electric car in April 2021 | टाटाने 77 टक्के बाजारपेठ काबीज केली; Tata Nexon EV बनली सर्वाधिक खपाची इलेक्ट्रीक कार

टाटाने 77 टक्के बाजारपेठ काबीज केली; Tata Nexon EV बनली सर्वाधिक खपाची इलेक्ट्रीक कार

Next

गेल्यावर्षीच्या सुरुवातीला लाँच झालेल्या टाटा नेक्सॉन ईव्हीने (TaTa Nexon EV) मोठी झेप घेतली आहे. एप्रिलमध्ये इलेक्ट्रीक कारमध्ये सर्वाधिक खपाची कार बनली आहे. इलेक्ट्रीक कार महागड्या असल्या तसेच चार्जिंग स्टेशन नसली तरीदेखील ज्यांना सोयीची आहे ते या कारकडे वळत असल्याचे दिसत आहे. (Tata Moters sold 525 units of Nexon EV in India last month, making it the best-selling electric car in India)


Jato Dynamics ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार Nexon EV च्या  525 कार गेल्या महिन्यात विकल्या गेल्या आहेत. यानंतर MG ZS EV चा नंबर लागत असून या एसयुव्हीच्या 156 कार विकल्या गेल्या आहेत. तर तिसऱ्या नंतरला टाटाचीच कार असून Tata Tigor EV चे 56 युनिट विकले गेले आहेत. ह्युंदाईच्या Kona EV चे 12 युनिट विकले गेले आहेत. 


या खपाबरोबर टाटाच्या या दोन कारनी भारतीय इलेक्ट्रीक वाहनांच्या बाजारात 77 टक्के वाटा उचलला आहे. नेक्सॉनच्या पेट्रोल आणि डिझेल व्हेरिअंटचा गेल्या महिन्यातील खप हा 6,413 एवढा होता. 


जाणून घ्या फिचर्स
Nexon EV कारची किंमत 13.99 लाखांपासून सुरू होते. Tata Nexon Electric तीन व्हेरिंयटमध्ये ( XM, XZ+ आणि XZ+ LUX) उपलब्ध आहे. Tata Nexon ची स्पर्धा एमजी ZS EV आणि ह्युंदाई कोनाशी आहे. मात्र या दोन्ही कारची किंमत नेक्सॉनपेक्षा जास्त आहे. टाटा नेक्सॉनच्या ईव्हीमध्ये 30.2 kWh लिथियम-आयनची बॅटरी देण्यात आली. ही बॅटरी कारच्या फ्लोरखाली आहे. पूरपरिस्थितीतही ही बॅटरी सुरक्षित राहील, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर नेक्सॉन 312 किलोमीटर अंतर कापेल. शून्य ते 100 किलोमीटर प्रति तास इतका वेग घेण्यासाठी नेक्सॉनला 9.9 सेकंद लागतात. नेक्सॉनला स्टँडर्ड 15A AC चार्जरनं 20 टक्क्यांहून 100 टक्क्यांपर्यंत चार्ज करण्यासाठी 8 तासांचा कालावधी लागतो. तर फास्ट चार्जरनं नेक्सॉनची बॅटरी ० ते ८० टक्क्यांपर्यंत ६० मिनिटांमध्ये चार्ज होते. 
नेक्सॉन ईव्हीमध्ये टाटानं नवीन ZConnect अ‍ॅप्लिकेशन दिलं आहे. या मोबाईल अ‍ॅप्लिकेशनमध्ये ३५ अद्ययावत सोयी सुविधा आहेत. यात एसयूव्हीची संपूर्ण माहिती देणारी आकडेवारी, रिमोट ऍक्सेस, सुरक्षेशी संबंधित सुविधांचा समावेश आहे. 

टाटा नेक्सॉन ईव्हीच्या XM या बेसिक व्हेरिएंटमध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, दोन ड्राईव्ह मोड, कीलेस एन्ट्री, पुश बटन स्टार्ट, ZConnect कनेक्टेड कार अ‍ॅप, फ्रंट-रियर पॉवर विंडो आणि इलेक्ट्रिक टेलगेटसारखी फिचर्स देण्यात आली आहेत. तर XZ+ मध्ये ड्यूल टोन कलर ऑप्शन, 16-इंचाचे डायमंड-कट अलॉय वील्झ, 7-इंची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, रियर कॅमरा आणि लेदर फिनिश स्टीयरिंग वील देण्यात आले आहेत. तर टॉप व्हेरिएंटमध्ये XZ+ LUX मध्ये सनरूफ, प्रीमियम लेदर फिनिश सीट्स आणि ऑटोमॅटिक रेन सेन्सिंग वायपर्स आणि ऑटोमॅटिक हेडलॅम्प्स या सुविधा देण्यात आल्या आहेत.

Web Title: Tata captures 77 percent EV market; Nexon EV was India's best-selling electric car in April 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.