कार विकण्यापूर्वी 'या' गोष्टींची विशेष काळजी घ्या, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 01:13 PM2022-11-05T13:13:53+5:302022-11-05T13:14:35+5:30

आता जर तुम्ही तुमची कार विकली आणि FASTag बंद केला नाही, तर नवीन खरेदीदार तुमच्या FASTag चे सर्व फायदे घेऊ शकतात.

Take special care of 'these' things before selling the car, otherwise big loss can happen! | कार विकण्यापूर्वी 'या' गोष्टींची विशेष काळजी घ्या, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान!

कार विकण्यापूर्वी 'या' गोष्टींची विशेष काळजी घ्या, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान!

Next

FASTag Rule  : जर तुम्ही तुमची कार विकण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टींची काळजी घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. कार विकण्यापूर्वी काही गोष्टींकडे लक्ष दिले नाही, तर तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. दरम्यान, एक काळ असा होता की, टोल नाक्यावर टोलमुळे लांबच लांब रांगा लागत होत्या. यामुळे वेळेचा अपव्यय होत होता.

ही समस्या सोडवण्यासाठी FASTag सुरू करण्यात आले. FASTag वापरण्याचा काळ सुरू झाला. त्यानंतर लोकांना टोल नाक्यावर लांबच लांब रांगांपासून सुटका मिळाली आणि टोल नाक्यावरील वाहनांची गर्दी देखील कमी होऊ लागली आहे. लोकांच्या वाहनावर FASTag चे स्टिकर विशिष्ट ठिकाणी चिकटवले जाते, त्यातून टोलचे पैसे आपोआप कापले जातात. यामुळे लोकांचा प्रवासातील बराच वेळ वाचू लागला आहे.

दरम्यान, FASTag ही एक डिजिटल पेमेंट सुविधा आहे, ज्याच्या मदतीने टोल नाक्यावर टोल पेमेंट केले जाते. जर तुम्ही तुमची कार विकली असेल आणि FASTag निष्क्रिय (डिअॅक्टिव्हेट) केले नाही तर तुम्हाला खूप नुकसान होऊ शकतो. त्यामुळे कार विक्री करण्यापूर्वी FASTag निष्क्रिय करणे अत्यंत आवश्यक आहे. FASTag अधिकृत जारीकर्त्यांकडून किंवा सहभागी बँकांकडून खरेदी केला जाऊ शकतो. हे तुमच्या बँकेला लिंक केलेले असते. 

आता जर तुम्ही तुमची कार विकली आणि FASTag बंद केला नाही, तर नवीन खरेदीदार तुमच्या FASTag चे सर्व फायदे घेऊ शकतात. अशा परिस्थितीत, कार विकण्यापूर्वी FASTag खाते बंद करणे आवश्यक आहे. याशिवाय, जर तुम्ही तुमचा FASTag बंद केला नाही, तर तुमच्या कारचा नवीन खरेदीदार सहजपणे तुमच्या FASTag चा फायदा घेऊ शकतो. दरम्यान, नवीन खरेदीदार तुमच्या FASTag सह पैसे देऊ शकतो, जे तुमच्या खात्यातून कापले जातील. पण, जोपर्यंत तुम्ही तुमचे FASTag खाते बंद करत नाही, तोपर्यंत तुमच्या कारचा नवीन मालक नवीन FASTag साठी अर्ज करू शकत नाही.

असे करू शकता FASTag अकाउंट बंद! 
- भारत सरकारच्या हेल्पलाइन क्रमांक 1033 वर कॉल करून तुम्ही FASTag संबंधित सर्व तक्रारींचे निराकरण करू शकता.
- तुम्ही तुमच्या सेवा प्रदात्याच्या ग्राहक सेवा क्रमांकावर कॉल करून FASTag बंद करू शकता.
- NHAI (IHMCL) - 1033 वर कॉल करा. येथे तुम्हाला FASTag बंद करण्याच्या प्रक्रियेबद्दल सांगितले जाईल.
- ICICI Bank - 18002100104 वर कॉल करा. येथे तुम्हाला FASTag बंद करण्याच्या प्रक्रियेबद्दल सांगितले जाईल.
- PayTm – 18001204210 वर कॉल करून तुम्ही तुमचे FASTag अकाउंट बंद करू शकता.
- Axis Bank – 18004198585 वर कॉल करून तुम्ही FASTag अकाउंट बंद करून घेऊ शकता.
- HDFC Bank - 18001201243 वर कॉल करा. येथे तुम्हाला FASTag अकाउंट बंद करण्याच्या प्रक्रियेबद्दल सांगितले जाईल.
- Airtel Payments Bank –  FASTag अकाउंट बंद करण्यासाठी 8800688006 क्रमांकावर कॉल करा. येथे तुम्हाला FASTag बंद करण्याच्या प्रक्रियेची संपूर्ण माहिती दिली जाईल.

Web Title: Take special care of 'these' things before selling the car, otherwise big loss can happen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.