Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 18:50 IST2026-04-05T18:49:43+5:302026-04-05T18:50:52+5:30
2026 Suzuki Burgman Street: आकर्षित डिझाइन आणि दमदार फीचर्ससह सुझुकीची लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅन भारतात लॉन्च झाली आहे.

Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
जपानी वाहन निर्माता कंपनी सुझुकीच्या बर्गमॅन या स्कूटरला भारतात मोठी पसंती मिळाली आहे. ही स्कूटर दुचाकी तरुणांच्या मनात भरली असून बाजारात त्याची मागणी वाढली आहे. हे लक्षात घेऊन कंपनीने या स्कूटरच्या डिझाईनपासून फीचर्समध्ये महत्त्वाचे बदल करून पुन्हा भारतात लॉन्च केली आहे. त्यामुळे सुझुकी बर्गमॅन खरेदी करण्यासाठी इच्छुक असलेल्या ग्राहकांना आता या स्कूटरमध्ये प्रीमिअम लूक आणि दमदार फीचर्स मिळणार आहेत. या स्कूटरची विक्री ८ एप्रिल २०२६ पासून सुझुकीच्या डीलरशिप्सवर सुरू होण्याची शक्यता आहे.
सुझकीच्या अक्सेस १२५ ला डोळ्यांसमोर ठेवून नवीन बॅर्गमॅन तयार करण्यात आली आहे. स्कूटरची फ्रेम ५०० ग्रॅमने कमी करण्यात आली असून २५ टक्के आणखी मजबूत झाली आहे. या स्कूटरची मॅक्सी‑स्कूटर स्टाइल कायम ठेवली आहे. परंतु आता त्यात शार्प बॉडी पॅनेल्स, डार्क स्मोक्ड विंडस्क्रीन आणि अधिक प्रीमियम लूक मिळत आहे. शिवाय, एलईडी हेडलँप, एलईडी टेल लँप आणि स्लिक इंडिकेटर या स्कूटरला आणखी आकर्षित बनवतात.
२०२६ सुझकी बर्गमॅन स्ट्रीट: किंमत
सुझुकीच्या बर्गमॅन स्कूटरमध्ये ४.२ इंचाचा टीएफटी कलर डिस्ले देण्यात आला आहे. त्याचबरोबर ग्राहकांना की‑लेस इग्निशन सिस्टम, यूएसबी चार्जिंग सपोर्ट, ड्युर युटिलिटी हूक, सुझुकी इजी स्टार्ट सिस्टम मिळत आहे. या स्कूटरच्या बेस व्हेरिएंटची किंमत १.०२ लाख (एक्स शोरूम किंमत) आहे. तर, टीएफटी एडीशनची किंमत १.१३ हजार इतकी आहे. महत्त्वाचे म्हणजे, कंपनीच्या आधीच्या बर्गमॅन स्ट्रीट एक्स मॉडेलच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आला नाही.
२०२६ सुझकी बर्गमॅन स्ट्रीट: इंजिन आणि परफॉर्मन्स
नव्या बर्गमॅनमध्ये ग्राहकांना १२४ सीसी एअर‑कूल्ड इंजिन आहे, जे सुमारे ८.३ बीएचबी पॉवर आणि १०.२ एनएम टॉर्क तयार करते. हे इंजिन सीव्हीटी गिअर्बॉक्ससोबत जोडलेले आहे. तसेच यात इलेक्ट्रिक आणि किक स्टार्ट दोन्ही सुविधा मिळतात. इंजिनमध्ये काही सुधारणा केल्या आहेत ज्यामुळे 30‑60 km/h रेंजमध्ये अधिक सुलभ पिक‑अप मिळण्यास मदत होते आणि एकंदर सवारीची गुणवत्ता सुधारली आहे. ब्रेकिंग सिस्टिममध्ये फ्रंट डिस्क + सीबीएस मिळते, परंतु एबीएस उपलब्ध नाही. नवी सुझुकी बर्गमॅन ही आता जुन्या मॉडेलपेक्षा अधिक प्रीमियम, स्मार्ट आणि युजर‑फ्रेंडली बनली आहे, जी शहरातील दिवसेंदिवस वाढणाऱ्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करेल.