दमदार फीचर्ससह भारतात लॉन्च झाली Suzuki ची स्टायलिश मॅक्सी स्कूटर, जाणून घ्या किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 12:51 IST2026-04-03T12:51:16+5:302026-04-03T12:51:54+5:30

Suzuki Burgman 2026: मोठे स्टोरेज, मॉडर्न डिझाइन आणि अॅडव्हान्स फीचर्समुळे ही स्कूटर डेली यूजसाठी उपयुक्त आहे.

Suzuki Burgman 2026: Suzuki's stylish maxi scooter launched in India with powerful features, know the price | दमदार फीचर्ससह भारतात लॉन्च झाली Suzuki ची स्टायलिश मॅक्सी स्कूटर, जाणून घ्या किंमत...

दमदार फीचर्ससह भारतात लॉन्च झाली Suzuki ची स्टायलिश मॅक्सी स्कूटर, जाणून घ्या किंमत...

Suzuki Burgman 2026: जपानी कंपनी Suzuki ने भारतात आपला नवीन Burgman 2026 मॅक्सी स्कूटर लॉन्च केली आहे. या स्कूटरची सुरुवातीची किंमत 1.02 लाख रुपये (एक्स-शोरूम) असून, टॉप व्हेरिएंटची किंमत 1.13 लाख रुपये पर्यंत जाते. विशेष म्हणजे हे नवीन मॉडेल जुन्या Burgman Street EX सोबतच विक्रीसाठी उपलब्ध राहणार असून, जुन्या मॉडेलच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

डिझाइनमध्ये मोठा बदल

Suzuki Burgman 2026 मध्ये सर्वात मोठा बदल त्याच्या डिझाइनमध्ये करण्यात आला आहे. या स्कूटरमध्ये आता ड्युअल-पॉड LED हेडलाइट्स देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे स्कूटर अधिक मॉडर्न आणि प्रीमियम दिसतो. हे डिझाइन कंपनीच्या इंटरनॅशनल मॉडेलवर आधारित असल्याचे सांगितले जात आहे.

याशिवाय नवीन कलर ऑप्शन, टॉप व्हेरिएंटमध्ये ड्युअल-टोन पेंट स्कीम आणि अधिक स्टायलिश बॉडी डिझाइन यामुळे ही स्कूटर तरुणांना लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे.

फीचर्समध्ये मोठे अपग्रेड

नवीन Burgman 2026 मध्ये अनेक अॅडव्हान्स फीचर्स देण्यात आले आहेत. 

मुख्य फीचर्समध्ये की-लेस स्टार्ट
ईझी स्टार्ट
सायलेंट स्टार्ट 
सर्व LED लाईट्स
4.2 इंच TFT डिजिटल डिस्प्ले
नेव्हिगेशन सपोर्ट
दोन फ्रंट स्टोरेज स्पेस
24.6 लिटर अंडर-सीट स्टोरेज

या सेगमेंटमध्ये TFT डिस्प्ले आणि नेव्हिगेशन फीचर हे या स्कूटरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य मानले जात आहे.

इंजिन, सस्पेंशन आणि परफॉर्मन्स

Suzuki Burgman 2026 मध्ये 124cc इंजिन देण्यात आले आहे, जे Suzuki Eco Performance (SEP) प्लॅटफॉर्मवर आधारित आहे.

इंजिन स्पेसिफिकेशन:

पॉवर: 8 हॉर्सपावर
टॉर्क: 10.2 Nm
फ्रंट सस्पेंशन: टेलिस्कोपिक
रियर सस्पेंशन: स्विंग आर्म
फ्रंट ब्रेक: डिस्क
रियर ब्रेक: ड्रम
12 इंच अलॉय व्हील्स
5.5 लिटर फ्यूल टँक

शहरातील रोजच्या वापरासाठी या स्कूटरची परफॉर्मन्स चांगली मानली जाते.

ही स्कूटर तुमच्यासाठी योग्य आहे का?

जर तुम्ही स्टायलिश, आरामदायक आणि फीचरने भरलेली स्कूटर शोधत असाल, तर Suzuki Burgman 2026 हा एक चांगला पर्याय ठरू शकते. मोठे स्टोरेज, मॉडर्न डिझाइन आणि अॅडव्हान्स फीचर्समुळे ही स्कूटर डेली यूजसाठी उपयुक्त आहे.

Web Title : दमदार फीचर्स के साथ Suzuki Burgman 2026 भारत में लॉन्च

Web Summary : Suzuki ने Burgman 2026 को भारत में ₹1.02 लाख की शुरुआती कीमत पर लॉन्च किया। इसमें LED हेडलाइट्स, डिजिटल डिस्प्ले और नेविगेशन के साथ नया डिज़ाइन है। 124cc इंजन द्वारा संचालित, यह दैनिक उपयोग के लिए पर्याप्त स्टोरेज और आधुनिक सुविधाएँ प्रदान करता है।

Web Title : Suzuki Burgman 2026 Launched in India with Stylish Features

Web Summary : Suzuki launched the Burgman 2026 in India, priced from ₹1.02 lakh. It boasts a redesigned look with LED headlights, a digital display, and navigation. Powered by a 124cc engine, it offers ample storage and modern features for daily use.