शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

स्पीडब्रेकर वैध की अवैध या वादात असले तरी ते एकप्रकारे स्लिपींग पोलीसमॅनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 22:33 IST

स्पीडब्रेकर अर्थात स्लीपींग पोलीसमॅन असल्याची ब्रिटनमधील व्याख्या असली तरी भारतात स्पीडब्रेकरची गरज अजून तरी आहे, त्यामुळे भले अपघात होत असले तरीही, रस्ते वापरकर्त्यांची मानसिकता पाहातागतीअवरोध होणार आहेच.

स्पीडब्रेकर, स्पीड बम्प, किंवा गतीअवरोधक हे आता रस्ता वाहतुकीमधील नित्याचेच शब्द झालेले आहेत. स्पीड ब्रेकर म्हणजे रस्त्यावरील वाहनांच्या गतीला आवश्यक तेथे आळा घालण्यासाठी केलेला उपाय आहे. ब्रिटनमध्ये या गतीअवरोधकाला slipping policeman म्हणून ओळखले जाते. भारतामध्ये काही ठिकाणी वा काही शहरांमध्ये तर बघावे तेथे स्पीडब्रेकर्स आहेत. त्यची संख्या गमतीशीर आहेच पण त्याचबरोबर त्याबाबत न्यायालयाला गांभीर्याने लक्षही द्यावे लागले आहे. अलीकडेच दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला तेथील गतीअवरोधकांची यादी तयार करायला सांगितले आहे. ही यादी ऑनलाइन प्रसिद्ध करावी असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. इतकेच नव्हे तर तेथे गतीअवरोधक बेकायदेशीरही आहेत व ते हटवण्यासाठी कारवाई करावी व एक समिती तयार करावी, असेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.दिल्लीत ९२९ गतीअवरोधकांपैकी ५८९ अधिकृत आहेत तर ३४० अनधिकृत गतीअवरोधक आहेत. ७ जून १९०६ मध्ये या स्पीडब्रेकर्स वा स्पीड बम्पचा पहिला उल्लेख न्यूयॉर्क टाइम्सला आला होता. शाथम (chatham) येथे या गतीअवरोधकाचा प्रथम अवलंब करण्यात आला. एका बाजूला या स्पीडब्रेकर्सची गरज भासते, तर त्या गतीअवरोधकाच्या भागामध्ये लोकांना तेथे होणार्या वाहनांच्या अधिक वर्दळीचा, त्यांच्या हॉर्न्सचा त्रासही होतो. काही असले तरी त्याची गरज नाहीच असेही म्हणता येत नाही, अपघात टाळण्यासाठी ती गरज आहेच. तरीही आकडेवारीनुसार २०१४ मध्ये या गतीअवरोधकांमुळे ११ हजार ८ वाहन अपघात झाले व २०१५ मध्ये ही संख्या काहीशी वाढून ११ हजार ८४ इतकी झाली. इतकेच नव्हे तर २०१४ मध्ये ३ हजार ६३३ व २०१५ मध्ये ३ हजार ४०९ इतक्या व्यक्तींना या संलग्न अपघातांपायी प्राण गमवावे लागले. या स्पीडब्रेकरमुळे दिवसाला ३० अपघात होतात तर नऊ जणांचे मृत्यूही होत असल्याचा निष्कर्ष एका विश्लेषणामध्ये काढलेला आढळतो.२०१५ मध्ये तर एकूण अपघातांमध्ये स्पीडब्रेकरमुळे झालेल्या अपघातांमध्ये ऑस्ट्रेलिया व ब्रिटनमध्ये सर्वात जास्त बळी गेले आहेत. किंबहुना रस्ते अपघातांमध्ये स्पीडब्रेकर्सचा हात अधिक असतो, असेही म्हणण्याप्रत मजल गेलेली आहे.इंडियन रोड काँग्रेसच्या विश्लेषणानुसार सर्व वाहनांना सुयोग्य ठरू शकेल असे स्पीडब्रेकरचे विशिष्ट डिझाईन भारतात एकंदर पाहाणीअंती तरी आढळत नाही. तरीही त्यांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार गतीअवरोधक हा गोलाकार असावा३.७ मीटर रुंदी, ०.१ मीटर उंची असवा. ताशी २५ किलोमीटर इतक्या वेगाने त्या ठिकाणी वाहतूक व्हावी. त्याची पूर्वसूचना देणारे फलक लावणे,काळ्या व पांढऱ्या रंगात हे गतीअवरोधक रंगवणे आदी सूचनाही आहेतच.मुळात वाहनांचा वेग नियंत्रित हवा हे साधेसुधे गणित आहे. रस्त्यावर वाहने ज्या गतीने जातात, त्यासाठी काही रस्त्यांची खासियतही असली पाहिजे, वाहतूक नियमांची जशी गरज असते, तशीच रस्त्यांच्या स्थितीचीही आवश्यकता असते.अर्थात काही झाले तरी या slipping police संकल्पनेला नाकारूनही चालणार नाही. भारतीय रस्त्यांची, वाहतुकीची, वर्दळीची, शहरांची, गावांची, महामार्गांची एकंदर परिस्थिती पाहिली म्हणजे या गती अवरोधाची नेमकी गरज का आहे,त्याचा अंदाजही प्रत्येकाला येऊ शकेल.

टॅग्स :Automobileवाहन