Skoda Slavia Launched: स्कोडाची स्लाविया लाँच; लूक, मायलेज खतरनाक; जाणून घ्या किंमत अन् फिचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 05:01 PM2022-02-28T17:01:31+5:302022-02-28T17:01:58+5:30

Skoda Slavia lunched news: स्कोडाने स्लाविया ही 1.0-लीटर टीएसआय इंजिनमध्ये लाँच केली आहे. तर 1.5-लीटर इंजिनची कार ३ मार्चला लाँच केली जाणार आहे.

Skoda Slavia 1.0 TSI Launched in three variants; Priced at Rs 10.69 Lakh, see mileage and features | Skoda Slavia Launched: स्कोडाची स्लाविया लाँच; लूक, मायलेज खतरनाक; जाणून घ्या किंमत अन् फिचर्स

Skoda Slavia Launched: स्कोडाची स्लाविया लाँच; लूक, मायलेज खतरनाक; जाणून घ्या किंमत अन् फिचर्स

googlenewsNext

प्रिमिअम कार निर्माता कंपनी स्कोडाने भारतात आपली मिड साईज प्रिमिअम सेदान कार Skoda Slavia लाँच केली आहे. ही कार पेट्रोलमध्ये आणण्यास आली असून या कारच्या बेस व्हेरिअंटची किंमत 10.69 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. स्लाविया ही मॅन्युअल आणि जीएसडी ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. यामध्ये दोन वेगवेगळ्या क्षमतेची इंजिन देखील उपलब्ध करण्यात आली आहेत. 

स्कोडाने स्लाविया ही 1.0-लीटर टीएसआय इंजिनमध्ये लाँच केली आहे. तर 1.5-लीटर इंजिनची कार ३ मार्चला लाँच केली जाणार आहे. स्लाविया ही कार तीन ट्रिम्समध्ये येते. Active (एक्टिव), Ambition (एम्बिशन) आणि Style (स्टाइल) अशी तीन व्हेरिअंट आहेत. यामध्ये मॅन्युअल आणि अॅटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्स देण्यात आला आहे. ऑटोमॅटिक सोबत टॉप-ऑफ-द-लाइन व्हेरिएंट स्टाइलची एक्स शोरुम किंमत 15.39 लाख रुपये आहे. या कारची डिलिव्हरी आजपासूनच सुरु होणार आहे. 

कुशक एसयूव्ही २०२१ मध्ये सादर करण्यात आली. त्यानंतर याच प्लॅटफॉर्मवरील स्लाविया 1.0 टीएसआय ही तयार करण्य़ात आली आहे. 85 kW (115 Ps) ची ताकद आणि 178 Nm इतका टॉर्क मिळतो. हे टीएसआय इंजिन 19.47 किमी/ली मायलेजचा दावा कंपनीने केला आहे. 

25.4 सेमी (10-इंच) टचस्क्रीन देण्यात आली आहे. 8.0-इंचाचा ऑल-डिजिटल ड्राइवर डिस्प्ले आणि कंट्रोल बटन असलेले स्टेअरिंग देण्यात आले आहे. कंपनीला जवळपास ५००० बुकिंग मिळाल्या आहेत. भारतीय बाजारता ही स्कोडा स्लाव्हिया Honda City, Maruti Suzuki Ciaz, Hyundai Verna आणि Volkswagen ची आगामी sedan Volkswagen Virtus सारख्या कारशी स्पर्धा करेल.

Web Title: Skoda Slavia 1.0 TSI Launched in three variants; Priced at Rs 10.69 Lakh, see mileage and features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Skodaस्कोडा