सिंपल वन जनरेशन १.५ ची सिंगल चार्जमध्ये २१२ किमी रेंज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 16:39 IST2025-02-11T16:36:40+5:302025-02-11T16:39:05+5:30
Simple One Gen 1.5 Electric Scooter : बंगळुरूस्थित इलेक्ट्रिक टू-व्हीलर स्टार्ट-अप सिंपल एनर्जीने आपली सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटर जनरेशन १.५ व्हर्जनसह अपडेट केली आहे.

सिंपल वन जनरेशन १.५ ची सिंगल चार्जमध्ये २१२ किमी रेंज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स...
Simple One Gen 1.5 Electric Scooter : जर तुम्हाला स्वतःसाठी इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. तुम्हाला जुन्या किमतीत अपग्रेडसह इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याची संधी मिळत आहे. बंगळुरूस्थित इलेक्ट्रिक टू-व्हीलर स्टार्ट-अप सिंपल एनर्जीने आपली सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटर जनरेशन १.५ व्हर्जनसह अपडेट केली आहे.
अपग्रेडनंतरही स्कूटरची एक्स-शोरूम किंमत १.६६ लाख रुपये आहे. तर सिंपल वनच्या जनरेशन १ ची सर्टिफाइड रेंज (आयडीसी) २१२ किलोमीटर होती. दुसरीकडे, जनरेशन १.५ मध्ये एकदा फूल चार्ज केल्यावर २४८ किमीची रेंज मिळते. कंपनीच्या दाव्यानुसार, ही भारतातील सर्वात लांब पल्ल्याची इलेक्ट्रिक स्कूटर बनू शकते.
रेंज वाढवण्याव्यतिरिक्त, जनरेशन १.५ मध्ये अनेक सॉफ्टवेअर चांगले आहेत. स्कूटरचे अॅप पूर्वीपेक्षाही अधिक सुधारित केले आहे. यामध्ये इंटिग्रेशन, नेव्हिगेशन, अपडेटेड राइड मोड्स, पार्क असिस्ट, ओटीए अपडेट्स, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, ट्रिप हिस्ट्री आणि स्टॅटिस्टिक्स, कस्टमायजेबल डॅश थीम, फाइंड माय व्हेईकल फीचर, ऑटो-ब्राइटनेस आणि टोन/साउंड यासारख्या फीचर्सचा समावेश आहे.
याचबरोबर, सुरक्षेसाठी रॅपिड ब्रेक, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि यूएसबी चार्जिंग पोर्ट देखील देण्यात आले आहेत. जर ग्राहक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असतील तर त्यांच्यासाठी सिंपल वन जनरेशन १.५ सिंपल एनर्जी डीलरशिपपर्यंत पोहोचल्या आहेत. ग्राहक सिंपल एनर्जी डीलरशिपमध्ये जाऊन खरेदी करू शकतात. ज्यांच्याकडे आधीच सिंपल वन जनरेशन १ आहे, ते सॉफ्टवेअर अपडेटद्वारे आपली स्कूटर अपग्रेड करू शकतात.
सिंपल वन जनरेशन १.५ च्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर, ही स्कूटर मागील स्कूटरच्याच किमतीत म्हणजेच १.६६ लाख रुपयांना (एक्स-शोरूम, बंगळुरू) मिळत आहे. यामध्ये ग्राहकांना ७५० वॅटचा चार्जर देखील मिळत आहे. ग्राहक बंगळुरू, गोवा, पुणे, विजयवाडा, हैदराबाद, विझाग आणि कोची येथील १० स्टोअरमधून स्कूटर खरेदी करू शकतात. दरम्यान, ही इलेक्ट्रिक स्कूटर २.७७ सेकंदात ०-४० किमी प्रतितास वेगाने धावू शकते. तसेच, आता या स्कूटरमध्ये पार्क असिस्ट फीचर मिळत आहे. जे बॅक साइड आणि रिअर अशा दोन्ही बाजूंनी मुव्हमेंट करता येते.