Ola-Ather चिंतेत, लॉन्च झाली 181 Km रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या किंमत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 22:05 IST2025-03-12T22:03:14+5:302025-03-12T22:05:36+5:30
भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी झपाट्याने वाढत आहे.

Ola-Ather चिंतेत, लॉन्च झाली 181 Km रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या किंमत...
EV Scooter : भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी झपाट्याने वाढत आहे. सिंपल एनर्जी (Simple Energy) ही या विभागातील एक महत्त्वाची कंपनी म्हणून उदयास आली आहे. कंपनीने OneS नावाची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करून आपला पोर्टफोलिओत वाढ केली आहे. ही 1,39,999 रुपयांची स्कूटर 181 किलोमीटरची रेंज देण्यास सक्षम आहे. सध्या बंगळुरू, गोवा, पुणे, विजयवाडा, हैदराबाद, वायझाग, कोची आणि मंगलोर येथील शोरूममध्ये ही OneS उपलब्ध असेल.
या नवीन स्कूटरचे डिझाइन यापूर्वीच्या सिंपल वन सारखेच आहे. यामध्ये कोनीय हेडलाइट्स, शार्प बॉडी पॅनेल्स आणि हाय टेललाईटसह उतार असलेली सीट मिळते. याची एकूणच स्पोर्टी डिझाईन याला आणखी आकर्षक आणि डायनॅमिक लुक देते. कंपनीने या OneS स्कूटरला चार रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च केले आहे. यात ब्रॅझन ब्लॅक, ग्रेस व्हाइट, अझूर ब्लू आणि नम्मा रेडचा समावेश आहे.
टचस्क्रीन डॅशबोर्ड आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी
स्कूटरच्या इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, सिंपल वनमध्ये 7-इंचाचा टचस्क्रीन डॅशबोर्ड आहे, जो ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह येतो. तसेच, यात कस्टमाइझ करण्यायोग्य थीम, ॲप इंटिग्रेशन, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि ओव्हर-द-एअर अपडेट मिळते. स्कूटरमध्ये 5-जी सिम देखील आहे, जे वायफायद्वारे इंटरनेटशी कनेक्ट होऊ शकते.
सेफ्टी फिचर्स
सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटरच्या अतिरिक्त वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, यात फाइंड माय व्हेईकल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), रीजनरेटिव्ह आणि रॅपिड ब्रेकिंग सिस्टीम आणि नवीन पार्क असिस्ट फंक्शन फॉरवर्ड आणि बॅकवर्ड अशा दोन्ही सुविधा आहेत.
रेंज आणि बॅटरी
OneS मध्ये 3.7kWh फिक्स्ड बॅटरी पॅक आहे, जो एका चार्जवर 181 किलोमीटरची रेंज देऊ शकतो. सध्याच्या डॉट वनपेक्षा हे 21 किलोमीटर जास्त आहे. स्कूटरमध्ये 8.5kW ची इलेक्ट्रिक मोटर आहे. याशिवाय उत्तम अनुभवासाठी चार राइड मोड आहेत, ज्यात इको, राइड, डॅश आणि सोनिकचा समावेश आहे. OneS 105 kmph चा टॉप स्पीड पकडू शकते.