सरदाराची सटकली...जेवढ्या रंगाच्या पगड्या, तेवढ्या रंगाच्या रोल्स रॉयस ताफ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 15:38 IST2018-11-13T15:36:05+5:302018-11-13T15:38:44+5:30

आपल्याला संता-बंताच्या किस्स्यांवरून पंजाबी लोकांची ओळख असली तरीही जिद्दीच्या जोरावर गगनभरारी घेणाऱ्या शिख लोकांबद्दल फारच कमी माहिती आहे.

Sikh Billionaire Colour Matches His Turbans With His Rolls Royces | सरदाराची सटकली...जेवढ्या रंगाच्या पगड्या, तेवढ्या रंगाच्या रोल्स रॉयस ताफ्यात

सरदाराची सटकली...जेवढ्या रंगाच्या पगड्या, तेवढ्या रंगाच्या रोल्स रॉयस ताफ्यात

नवी दिल्ली : आपल्याला संता-बंताच्या किस्स्यांवरून पंजाबी लोकांची ओळख असली तरीही जिद्दीच्या जोरावर गगनभरारी घेणाऱ्या शिख लोकांबद्दल फारच कमी माहिती आहे. आज आपण अशाच एका सरदाराबाबत जाणून घेणार आहोत. एका इंग्रजाने केलेल्या अवहेलनेवर त्याला दिलेले आव्हान या सरदाराने पूर्ण करून दाखवले आहे. हे काही थोडेथोडके नाही, तर तब्बल 10 रोल्स रॉयस कार खरेदी करून.


इंग्लंडमध्ये राहणारे भारतीय अब्जाधीश सध्या सोशल मिडियावर भलतेच व्हायरल होत आहेत. शीख उद्योगपती रुबेन सिंह यांनी एक-दोन नाही तर जगातील सर्वात महागडी कार Rolls Royce च्या तब्बल 10 कार ताफ्यात ठेवल्या आहेत, त्याही वेगवेगळ्या रंगाच्या. थक्क झालात ना, कारणही तसेच आहे. 


रुबेन यांच्यावर एका ब्रिटीश नागरिकाने वर्णद्वेशी टिप्पणी केली होती. रुबेन यांना एकेकाळी ब्रिटीश बिल गेट्स म्हटले जात होते. त्यांचा व्यवसाय तेव्हा 10 दशलक्ष पाऊंड एवढा मोठा होता. त्यांनी Miss Attitude हा कपड्यांचा ब्रँड बाजारात आणला होता. मात्र, काही वेळाने दिवस फिरले आणि त्यांना व्यवसाय केवळ 1 पाऊंड एवढ्या कमी किंमतीत विकावा लागला होता. त्यांच्या ताब्यातून AllDayPA कंपनीही गेली आणि त्यांना दिवाळखोर घोषित करण्यात आले. 


यावरून एका ब्रिटीश उद्योजकाने रुबेन यांची पगडी पाहून तुम्ही केवळ विविध रंगाच्या पगड्याच घालू शकता, अशी टिप्पणी केली होती. त्याचे हे बोलने रुबेन यांना लागले आणि त्यांनी पुन्हा व्यवसाय उभा करण्याचे ठरवले. त्यांनी त्याच  ब्रिटीश उद्योजकाला ठणकावत सांगितले की, जेवढ्या रंगाच्या पगड्या घालेन, तेवढ्याच रंगाच्या रोल्स रॉयस गाड्या बाळगेन.


यानंतर रुबेन यांनी 2015 मध्ये पुन्हा AllDayPA वर ताबा मिळविला. यानंतर त्यांनी एक नाही तर तब्बल 10 रोल्स रॉयस खरेदी केल्या. सोशल मिडियावर तरुणवर्गाने त्यांना डोक्यावर उचलून घेतले आहे. 
 

Web Title: Sikh Billionaire Colour Matches His Turbans With His Rolls Royces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.