शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

कारच्या पुढच्या मागच्या काचांमधील काचा - खोचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 12:48 IST

कारची पुढची व मागची काच ही साधारणपणे सुरक्षित काच म्हणून ओळखली जाते. ती फुटल्यानंतर ती विखरून पडत नाही, परस्परांना त्याचे तुकडे अडकून राहातात त्यामुळे काचेचे तुकडे लागून प्रवासी जखमी होण्याचा धोका कमी असतो.

ठळक मुद्देगंमतीची बाब म्हणजे या काचेचा शोध हा जाणीवपूर्वक नव्हे तर चुकूनच लागलेला आहेफ्रेंच शास्त्रज्ञ एडूओर्ड बेनेडीक्टस काम करत असताना एका काचेच्या भांड्यावर चुकीने प्लॅस्टिकचा थर बसलाहे भांडे जेव्हा खाली पडले तेव्हा ते न फुटलेले बेनेडीक्टस यांनी पाहिले. त्यातूनच त्यांना ही कल्पना सुचली

खळ्ळ खट्याक … आवाज आणि इतस्तत: विखुरणारे तुकडे-काच फुटल्यावरच्या अगदी स्वाभाविक गोष्टी! परंतु असे काचेच्या बाबतीत सर्वसाधारण दिसत असले तरी गाडीची समोरची काच फुटली तर मात्र असे घडताना दिसत नाही. ती फुटली तरी सर्व तुकडे तिथेच राहतात व कोळ्याच्या एखाद्या जाळ्याप्रमाणे नक्षी तयार होते. हे तर नवलच म्हणावे लागते. यासा सुरक्षित काच असे सर्वसाधारण भाषेत म्हटले जाते. काच फुटल्यानंतरही ती विखुरली जात नाही, अशा या काचेला लॅमिनेटेड ग्लास असे म्हणतात आणि हा गुणधर्म तिला तिच्या रचनात्मक वैशिष्ट्यांमुळे प्राप्त झालेला आहे.

ही काच तयार करत असताना दोन काचेच्या थरांमधे एक प्लॅस्टिकचा म्हणजेच 'पॅालिव्हिनील ब्युटीरल'चा थर असतो.ह्या थरामुळे काच फुटली तरी तिचे तुकडे होउन न विखुरता ते एकाच ठिकाणी जोडलेले राहून जाळीदार स्वरूपात दिसतात. त्यामुळे वाहनातील व वाहनाजवळील व्यक्तींना काचेचे तुकडे लागून होणारी इजा टाळली जाते. अशा काचा वापरण्यापूर्वी जेव्हा साध्या काचा वापरल्या जात असत तेव्हा अपघातामध्ये काचांचे तुकडे लागल्यामुळे प्रवाशांना मोठी इजा झाल्याचेही दाखले सापडतात. लॅमिनेटेड काचांचा वापर वाढल्यापासून गाडी उलटण्यासारख्या गंभीर स्वरुपाच्या अपघातातही गाडीतील माणसांच्या सुरक्षेत वाढ झाल्याचे सिद्ध झाले आहे.

यात आणखी एक गंमतीची बाब म्हणजे या काचेचा शोध हा जाणीवपूर्वक नव्हे तर चुकूनच लागलेला आहे. १९०३ साली फ्रेंच शास्त्रज्ञ एडूओर्ड बेनेडीक्टस प्रयोगशाळेत काम करत असताना एका काचेच्या भांड्यावर चुकीने प्लॅस्टिकचा थर बसला. हे भांडे जेव्हा खाली पडले तेव्हा ते न फुटलेले बेनेडीक्टस यांनी पाहिले. त्यातूनच त्यांना ही कल्पना सुचली व लॅमिनेटेड काचेचा जन्म झाला. 

आता जवळ-जवळ साठ वर्षे ही काच वाहन उद्योगात वापरली जात आहे. सुरक्षेच्या सर्वात महत्वाच्या फायद्याबरोबरच ह्या काचेचे काही अन्य फायदेही आहेत. रचनेप्रमाणे मधला थर प्लॅस्टिकचा असल्यामुळे ह्या काचेतून आवाज कमी प्रमाणात आरपार होतो त्यामुळे इंजिनचा तसेच बाहेरील अन्य आवाज प्रवासी कक्षापर्यंत साधारणपणे ५० टक्के इतका कमी पोहोचतो. लॅमिनेटेड काचेतील प्लॅस्टिक आवाजाबरोबरच तापमानालाही अवरोध करते. सूर्यप्रकाशात असलेली इन्फ्रारेड किरणे या काचा ९९ टक्के इतकी परावर्तित करतात. परिणामत:कारमधील तापमान हे बाहेरील तापमानापेक्षा थोडेसे कमी राहाते.

परंतु वाहनाच्या सर्व काचांमधे लॅमिनेटेड काच वापरण्याचा एक तोटादेखील आहे आणि तो म्हणजे आपत्कालीन सुटकेसाठी होणारा त्रास. लॅमिनेटेड काचेच्या गुणधर्माचा म्हणजेच लवकर न तुटण्याचा तोटा होतो तो इथे! काच लवकर फुटत नसल्याने गाडीत अडकलेल्या माणसांना बाहेर पडण्यासाठी फार त्रास होतो किंबहुना बरेच वेळा ते शक्य होत नाही व अशा प्रसंगात प्राणहानीही होऊ शकते. यामुळेच गाडीतील सर्व काचांसाठी लॅमिनेटेड काच वापरावी का हा अजूनही वादाचाच मुद्दा आहे! जर काच आतून जलद गतीने व कमी श्रमात फोडण्यासाठी काही सोय करता आली जसे की एखादा हातोडा किंवा तत्सम अवजारकारमध्ये तयार ठेवायला हवे. तसे केले गेले तर तर मात्र सर्व काचांसाठी लॅमिनेटेड काच वापरणे सोयिस्कर व सुरक्षित ठरू शकेल हे नक्की.

टॅग्स :AutomobileवाहनAccidentअपघातcarकार