₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 16:36 IST2026-04-05T16:35:39+5:302026-04-05T16:36:37+5:30

गेल्या महिन्यात २१,२२४ ग्राहकांनी या कारला पसंती दिली असून, हिच्या वार्षिक विक्रीत तब्बल ३७.२८ टक्क्यांची मोठी वाढही नोंदवण्यात आली आहे.

₹6 lakh 25 thausands car makes a splash 5-star safety and 33 km mileage number 1 in sales in india | ₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१

₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१

भारतीय बाजारात एसयूव्हींची मागणी वाढत असतानाही, मारुती सुझुकीच्या 'डिझायर' (Maruti Suzuki Dzire) ची लोकप्रिय काय असल्यचे दिसते. आता ही कार पुन्हा एकदा नंबर वन ठरली आहे. मार्च २०२६ मधील विक्री बघता, डिझायर ही केवळ देशातील बेस्ट सेलिंग सेडानच नव्हे, तर सर्वाधिक विकली जाणारी कारही ठरली आहे. गेल्या महिन्यात २१,२२४ ग्राहकांनी या कारला पसंती दिली असून, हिच्या वार्षिक विक्रीत तब्बल ३७.२८ टक्क्यांची मोठी वाढही नोंदवण्यात आली आहे.

नवी डिझायर अधिक प्रीमियम अन् स्पोर्टी लुक -
नवी डिझायर आता अधिक प्रीमियम आणि स्पोर्टी लुकमध्ये सादर करण्यात आली आहे. यात १.२ लीटरचे नवीन झेड-सीरीज ३-सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळते, जे ८० बीएचपी पॉवर जनरेट करते. मायलेजच्या बाबतीत बोलायचे जाल्यास, ही कार मॅन्युअलमध्ये २४.७९ किमी, ऑटोमॅटिकमध्ये २५.७१ किमी, तर सीएनजी (CNG) मॉडेलमध्ये तब्बल ३३.७३ किमी प्रति किलो एवढे इतके शानदार मायलेज मिळते.

लक्झरी फीचर्स आणि ५-स्टार सेफ्टी -
या कारच्या केबिनमध्ये पहिल्यांदाच इलेक्ट्रिक सनरूफ, ९-इंचांचा टचस्क्रीन, वायरलेस चार्जिंग आणि ३६०-डिग्री कॅमेरा यांसारखे हायटेक फीचर्स देण्यात आले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ग्लोबल NCAP क्रैश टेस्टमध्ये या कारला ५-स्टार सेफ्टी रेटिंगही मिळाले आहे. 

६-एअरबॅग्स आणि एबीएस यांसारखी वैशिष्टे -
महत्वाचे म्हणजे, सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या, ६-एअरबॅग्स आणि एबीएस (ABS)सह EBD, यांसारख्या सुरक्षा वैशिष्ट्यांसह ही कार ६.२५ लाख ते ९.३१ लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) किंमतीत उपलब्ध आहे. बाजारात हिची थेट स्पर्धा होंडा अमेझ, ह्युंदाई ऑरा आणि टाटा टिगोर यांसारख्या कारशी आहे.

Web Title : मारुति डिजायर का दबदबा: 5-स्टार सुरक्षा, 33kmpl माइलेज, टॉप सेलर!

Web Summary : मारुति सुजुकी डिजायर भारत में सबसे ज्यादा बिकने वाली सेडान है, जिसमें 5-स्टार सुरक्षा है। इसका माइलेज सीएनजी मोड में 33kmpl तक पहुंचता है। ₹6.25 लाख से शुरू, इसमें सनरूफ, टचस्क्रीन और छह एयरबैग हैं।

Web Title : Maruti Dzire Dominates: 5-Star Safety, 33kmpl Mileage, Top Seller!

Web Summary : Maruti Suzuki Dzire is the best-selling sedan in India, boasting 5-star safety. Its mileage reaches 33kmpl in CNG mode. Priced from ₹6.25 lakhs, it features a sunroof, touchscreen, and six airbags.