नवी दिल्ली: रॉयल एनफिल्डच्या चाहत्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. कंपनीची बहुप्रतिक्षित पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल 'फ्लाइंग फ्ली' नुकतीच भारतीय रस्त्यांवर टेस्टिंगदरम्यान दिसून आली आहे. विशेष म्हणजे, ही बाईक कोणत्याही आवरणाशिवाय दिसल्याने तिच्या डिझाइनबद्दलच्या चर्चांना उधाण आले आहे.
'फ्लाइंग फ्ली'चे डिझाइन दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील मूळ 'फ्ली' मोटरसायकलवरून प्रेरित आहे. यात गोल हेडलाईट, मोठे अलॉय व्हील्स आणि स्लिम लूक देण्यात आला आहे, जो बाईकला एक क्लासिक 'रेट्रो' लूक देतो. यात चेन ऐवजी 'बेल्ट ड्राईव्ह' सेटअप वापरण्यात आला आहे, ज्यामुळे ही बाईक चालवताना अत्यंत शांत अनुभव देईल. सुरक्षिततेसाठी दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.
दमदार बॅटरी आणि रेंजअधिकृत माहिती अद्याप समोर आली नसली तरी, या बाईकमध्ये ४ ते ५ kWh क्षमतेची बॅटरी असण्याची शक्यता आहे. एका चार्जवर ही बाईक सुमारे १५० किलोमीटरची रेंज देऊ शकते. परफॉर्मन्सच्या बाबतीत ही बाईक ३५० ते ४०० सीसी क्षमतेच्या पेट्रोल बाईकला टक्कर देईल अशा ताकदीची असेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
कधी होणार लाँच?रॉयल एनफिल्डने ही बाईक पहिल्यांदा 'EICMA 2024' मध्ये जगासमोर सादर केली होती. आता तिचे प्रॉडक्शन-रेडी व्हर्जन टेस्टिंगमध्ये दिसत असल्याने, पुढील २ ते ३ महिन्यांत ही इलेक्ट्रिक बाईक भारतीय बाजारपेठेत अधिकृतपणे लाँच होण्याची शक्यता आहे.
Web Summary : Royal Enfield's 'Flying Flea' electric bike, inspired by WWII models, was spotted testing in India. It features a classic retro design, belt drive, and disc brakes. Expected to launch soon, it may offer a 150km range and rival 350-400cc petrol bikes.
Web Summary : रॉयल एनफील्ड की 'फ्लाइंग फ्ली' इलेक्ट्रिक बाइक, द्वितीय विश्व युद्ध के मॉडल से प्रेरित, भारत में टेस्टिंग के दौरान देखी गई। इसमें क्लासिक रेट्रो डिज़ाइन, बेल्ट ड्राइव और डिस्क ब्रेक हैं। जल्द ही लॉन्च होने की उम्मीद है, यह 150 किमी की रेंज दे सकती है और 350-400cc पेट्रोल बाइक को टक्कर दे सकती है।