Royal Enfield बुलेट आणि इलेक्ट्राचे ब्रेक खराब; माघारी बोलावल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 16:08 IST2019-05-07T16:07:39+5:302019-05-07T16:08:17+5:30
बाईकचे ब्रेक खराब असल्याने त्यामध्ये विनाशुल्क बदल केले जाणार आहेत.

Royal Enfield बुलेट आणि इलेक्ट्राचे ब्रेक खराब; माघारी बोलावल्या
दणदाकट मोटारसायकलसाठी प्रसिद्ध असलेल्या रॉलय एन्फिल्डच्या बुलेट आणि इलेक्ट्रा या दोन धासू बाईक कंपनीने माघारी बोलावल्या आहेत. या बाईकचे ब्रेक खराब असल्याने त्यामध्ये विनाशुल्क बदल केले जाणार आहेत. 20 मार्च 30 एप्रिल 2019 या काळात विकल्या गेलेल्या तब्बल 7 हजार बाईकच्या ब्रेकमध्ये खराबी असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
या दोन्ही बाईकमधील ब्रेक कॅलिपरमध्ये खराबी आहे. हे कॅपिलर व्हेंडरने पाठविले होते. तपासणीमध्ये पुढे आले आहे की, ब्रेक कॅपिलरला बोल्टच्या आधारावर ठेवण्यात आले होते. व्हेंडरने केलेल्या या बदलामुळे कंपनीच्या गुणवत्ता पूर्ण होत नव्हती. यामुळे हा भाग बदलण्यात येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
ब्रेक कॅलिपर हा बाईक वेगात असताना अचानक थांबविण्यासाठी ब्रेक दाबल्यानंतर ब्रेक होजला सुरक्षित करणारा महत्वाचा भाग आहे. खराब असलेल्या या पार्टमुळे बाईकच्या ब्रेकिंगवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे विकल्या गेलेल्या 7 हजार बाईकची तपासणी करण्यात येणार आहे.
या काळात बनविलेल्या गेलेल्या बाईकच्या ग्राहकांना संपर्क साधून बोलाविण्यात येणार असल्याचे कंपनीने सांगितले.