ही आहे जगातली सर्वात महागडी कार, अंबानींकडेही नाही ही कार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 15:24 IST2018-07-06T15:24:18+5:302018-07-06T15:24:36+5:30

ज्या कारबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, त्या कारची किंमत याहूनही जास्त आहे. आज रोल्स रॉयस कंपनीच्या एका खास कारची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.

Rolls Royce Sweptail thirteen million dollar world's most expensive car | ही आहे जगातली सर्वात महागडी कार, अंबानींकडेही नाही ही कार!

ही आहे जगातली सर्वात महागडी कार, अंबानींकडेही नाही ही कार!

रोल्स रॉयस ही जगात सर्वात शानदार आणि लक्झरी कार तयार करणारी कंपनी म्हणून लोकप्रिय आहे. कुणालाही जर महागड्या कारच्या किंमतीचा अंदाज लावायला सांगितला तर कुणीही 10 कोटी किंवा 20 कोटी असा अंदाज लावतील. पण ज्या कारबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, त्या कारची किंमत याहूनही जास्त आहे. आज रोल्स रॉयस कंपनीच्या एका खास कारची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.

Rolls Royce च्या कार्सचे फीचर्स फारच खास असतात. असे फीचर्स तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही कारमध्ये बघायला मिळत नाहीत. जर दोन वेगवेगळ्या Rolls Royce कार तुम्ही बघाल तर तुम्हाला नक्कीच काहीना काही फरक बघायला मिळेल. कारण या कंपनीच्या कार एकसारख्या नसतात. 

प्रत्येक Rolls Royce कार ही वेगळ्या रंगामध्ये आणि वेगळ्या इंटेरिअरमध्ये तयार केली जाते. Rolls Royce च्या या कारमध्ये 6.75 लिटर व्ही-12 इंजिन देण्यात आलं आहे. ही कार एका खास ग्राहकासाठी तयार करण्यात आली आहे. या कारची प्रत्येक गोष्ट वेगळी तयार करण्यात आली आहे. ही जगातली सर्वात खास कार असल्याचे सांगितले जात आहे. 

इंटेरिअरबाबत सांगायचं तर या एसयूव्हीमध्ये टायटॅनियम घड्याळ, मॅकेस्सार इबोनी लाकडाचं काम यात करण्यात आलं आहे. महत्वाची बाब म्हणजे या कारच्या फ्रेमला लाकडाने तयार करण्यात आलंय. या व्हिडीओत ते तुम्हाला बघायला मिळेल. या कारच्या किंमतीबाबत सांगायचं तर या कारची किंमत तब्बल 84 कोटी रुपये इतकी आहे. 

Web Title: Rolls Royce Sweptail thirteen million dollar world's most expensive car