किंमत इतकी की शून्य मोजून थकाल; जगात फक्त ३ लोकांकडे ही सुपरकार, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 15:30 IST2025-07-01T15:29:52+5:302025-07-01T15:30:17+5:30

Rolls-Royce Boat Tail: कंपनीने या गाडीचे फक्त तीन युनिट्स तयार केले होते.

Rolls-Royce Boat Tail: price is so high that you will get tired of counting to zero; Only 3 people in the world have this supercar | किंमत इतकी की शून्य मोजून थकाल; जगात फक्त ३ लोकांकडे ही सुपरकार, जाणून घ्या...

किंमत इतकी की शून्य मोजून थकाल; जगात फक्त ३ लोकांकडे ही सुपरकार, जाणून घ्या...

Rolls-Royce Boat Tail: जगभरात लक्झरी गाड्यांबद्दल लोकांमध्ये एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. एक कंपनी अशी आहे, जी जगातील सर्वात महागड्या लक्झरी कार्स बनवते. रोल्स-रॉइस कंपनी जगातील सर्वात महागड्या गाड्या बनवते. कंपनीची एक कार अशी पण आहे, जी जगात फक्त 3 लोकांकडे आहे. विशेष म्हणजे, या कारची किंमत एवढी आहे की, तुम्ही शुन्य मोजून थकाल.

ही कार रोल्स-रॉइस बोट टेल आहे. या कारची किंमत तब्बल 28 मिलियन अमेरिकन डॉलर्स, म्हणजेच सुमारे 232 कोटी रुपये आहे. रोल्स रॉइसने या कारचे फक्त तीन युनिट बनवले आहेत. या तीन युनिट्स ग्राहकांनुसार कस्टमाइझ करुन बनवल्या आहेत.

कारला एक खास डिझाइन देण्यात आले आहे
या रोल्स-रॉइस कारला बोटीसारखी डिझाइन देण्यात आली आहे. संपूर्ण जगात या कारचे फक्त तीन मॉडेल बनवण्यात आले आहेत. रोल्स-रॉइस बोट टेल ही 4-सीटर कार आहे. या कारमध्ये दोन रेफ्रिजरेटर देखील आहेत, त्यापैकी एक शॅम्पेन ठेवण्यासाठी डिझाइन केलेले आहे.

तीन युनिट्सचे मालक कोण आहेत?
तीन कारपैकी एक अब्जाधीश रॅपर जे-झेड आणि त्यांची पत्नी बेयॉन्से यांच्या मालकीची आहे. दुसऱ्या मॉडेलच्या मालकाबद्दल बोलायचे झाले तर, ती एका प्रसिद्ध मोती उद्योगातील व्यावसायिकाकडे आहे. तर, या जगातील सर्वात महागड्या कारचा तिसरा मालक अर्जेंटिनाचा फुटबॉलर मौरो इकार्डी आहे. या तिघांकडे जगातील सर्वात महागडी कार आहे.

Web Title: Rolls-Royce Boat Tail: price is so high that you will get tired of counting to zero; Only 3 people in the world have this supercar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.