Renault Triber: रेनो ट्रायबर किती सुरक्षित? देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कारची Global NCAP ने घेतली टेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 02:01 PM2021-06-02T14:01:37+5:302021-06-02T14:02:18+5:30

Renault Triber Global NCAP crash tests Rating: रस्ते अपघातात तुमचा जीव वाचवू शकणार का सर्वात स्वस्त 7-सीटर कार? जाणून घ्या...

Renault Triber gets 4 star Global NCAP safety rating; 3 star for child | Renault Triber: रेनो ट्रायबर किती सुरक्षित? देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कारची Global NCAP ने घेतली टेस्ट

Renault Triber: रेनो ट्रायबर किती सुरक्षित? देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कारची Global NCAP ने घेतली टेस्ट

googlenewsNext

Renault Triber Safety News: देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार म्हणून ओळखली जाणारी आणि 75,000 ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या रेनो ट्रायबर (Renault Triber) किती सुरक्षित आहे, याची Global ncap ने टेस्ट घेतली आहे. मारुतीच्या गाड्या जिथे फेल ठरल्या तिथे टाटा, महिंद्राने 5 स्टार रेटिंग मिळविले आहे. आता रेनोची ही फॅमिली कार किती सुरक्षित आहे, याचे रेटिंगही आले आहे. (Renault Triber: How safe is the Renault Triber? Global NCAP tests cheapest 7 seater car in the country.)


रेनो ट्रायबरला ग्लोबल एनकॅप कडून 4-स्टार अॅडल्ट आणि 3-स्टार चाईल्ड रेटींग देण्यात आले आहे. (Renault Triber Global NCAP crash tests Rating) एवढे रेटिंग मिळविणारी रेनो ट्रायबर ही पहिली सात सीटर कार ठरली आहे. अतिशय-आटोपशीर आणि प्रशस्त, रेनो ट्रायबर’ला ग्लोबल एनसीएपी’कडून 4-स्टार सेफ्टी रेटींग फॉर एडल्ट ऑक्यूपंट सेफ्टी आणि 3 स्टार चाईल्ड ऑक्यूपंट सेफ्टी पुरस्काराने गौरविण्यात आल्याची घोषणा रेनो इंडियाने आज केली. ही कार ऑगस्ट 2019 मध्ये लाँच करण्यात आली होती. 


रेनो ट्रायबरचे फिचर्स जाणून घ्या...
फीचर्सबद्दल सांगायचं झालं तर या MPV मध्ये प्रोजेक्टर हेडलँप, LED डे टाइम रनिंग लाईट्स, 8.0 इंचाचा ट्चस्क्रिन एन्फोटेन्मेंट सिस्टम देण्यात आली आहे. ही सिस्टम अॅपल कार प्ले आणि अँड्रॉईड ऑटोद्वारे कनेक्ट केली जाऊ शकते. तसंच तिन्ही रो मध्ये एसी वेंट्स, कुल्ड सेंटर बॉक्स, किलेस एंट्री, पुश बटन स्टॉर्ट/स्टॉप, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्यूशन (EBD), रिव्हर्स पार्किंग सेन्सर, पॉवर विंडो आणि रियर वॉश वायपर सारखेही फीचर्स देण्यात आले आहेत. तसंच या कारमधील तिसऱ्या रोमधील सीट ही डिटॅचेबल आहे. 

या कारमध्ये कंपनीनं 1.0 लीटर क्षमतेचं 3 सिलिंडर असलेलं पेट्रोल इंजिन दिलं आहे. जे 5 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येतं. हे इंजिन 70bhp ची पॉवर आणि 96Nm चा टॉर्क जनरेट करतं. तिसऱ्या रोमधील सीट या डिटॅचेबल आहेत. तसंच आवश्यकता नसल्यास त्या फोल्डही करता येतात. सीट फोल्ड केल्यास तुम्हाला 625 लीटरची बूट स्पेस मिळते. या कारच्या टॉप मॉडेलसह कंपनीनं 4 एअरबॅग्स, 8 इंचाचा इन्फोटेन्मेंट सिस्टम आणि क्लायमेट कंट्रोल सारखे फीचर्स दिले आहे. ही MPV एकूण चार रंगात उपलब्ध आहे. यामध्ये RXE, RXL, RXT आणि RXZ व्हेरिअंट्सचा समावेश आहे. याच्या RXE व्हेरिअंटची किंमत 5.30 लाख रुपये, तर टॉप मॉडेल RXZ ची किंमत 7.65 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. 

Web Title: Renault Triber gets 4 star Global NCAP safety rating; 3 star for child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.