renault is offering 40000 discount on kwid car | फक्त 2.99 लाखांच्या Renault Kwidवर मिळतोय 40,000 रुपयांचा बंपर डिस्काउंट, 'हे' आहेत खास फिचर्स

फक्त 2.99 लाखांच्या Renault Kwidवर मिळतोय 40,000 रुपयांचा बंपर डिस्काउंट, 'हे' आहेत खास फिचर्स

ठळक मुद्देभारतात ही कार अत्यंत लोकप्रीय आहे. एवढेच नाही, तर या कारची मागणीही मोठी आहे. या कारमध्ये स्पीड अलर्ट सिस्टिमसह ड्रायव्हर एअर बॅगसारखे स्टँडर्ड सेफ्टी फीचरदेखील ऑफर करण्यात आले आहेत.ग्रामिण भागांतील ग्राहकांना 9,000 रुपयांचा स्पेशल डिस्काउंट मिळेल.

नवी दिल्ली - फेस्टिव्ह सीझन सुरू होण्यापूर्वीच  Renaultने आपल्या कारवर बंपर ऑफर्स द्यायलाही सुरुवात केली आहे. क्विड ही किफायतशीर किमतीत उपलब्ध होणारी एक एंट्री लेव्हल कार आहे. भारतात ही कार अत्यंत लोकप्रीय आहे. एवढेच नाही, तर या कारची मागणीही मोठी आहे. जाणून घेऊया, या कारवरील डिस्काउंट आणि हिच्या फिचर्ससंदर्भात.

इंजिन आणि पावर - Renault Kwidमध्ये दोन इंजिन ऑप्शन्स उपलब्ध आहेत. यात पहिले 0.8 लीटरचे 3 सिलिंडर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 54 एचपीची मॅक्झिमम पावर आणि 72 न्यूटन मीटर पीक टॉर्क जनरेट करते. दुसऱ्या इंजिनचा विचार केल्यास ते 1.0 लीटरचे 3 सिलिंडर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 68 एचपीची मॅक्झिमम पावर आणि 91 न्यूटन मीटरचे पीक टॉर्क जनरेट करते. विशेष म्हणजे हे दोन्ही इंजिन मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रांसमिशनने परीपूर्ण आहेत.

फीचर्स - क्विडमध्ये सुरक्षिततेसाठी अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम, इलेक्ट्रॉनिक्स ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्यूशन, सीट बेल्ट रिमाइंडर, स्पीड अलर्ट सिस्टिमसह ड्रायव्हर एअर बॅगसारखे स्टँडर्ड सेफ्टी फीचरदेखील ऑफर करण्यात आले आहेत. या कारच्या टॉप व्हेरिएंटसंदर्भात बोलल्यास, यात रिअर पार्किंग कॅमेरा, 8 इंचांचे टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम देण्यात आले आहे. हे अँड्रॉईड ऑटो आणि अॅप्पल कारप्लेला सपोर्ट करते. 

ऑफर आणि किंमत - आपल्याला या कारवर 40,000 रुपयांचा बंबर डिस्काउंट मिळत आहे. या डिस्काउंट ऑफरमध्ये ग्रामिण भागांतील ग्राहकांना 9,000 रुपयांचा स्पेशल डिस्काउंट मिळेल. एवढेच नाही, तर यावर 3.99 टक्क्यांचा रेट ऑफ इंटरेस्टचाही फायदा मिळत आहे. ही कार 2.99 लाख रुपयांत (एक्स-शोरूम) उपलब्ध आहे.
 

English summary :
Renault is offering 40000 discount on kwid car.

Web Title: renault is offering 40000 discount on kwid car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.