शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्ट्रिक गाड्यांसाठी सरकारने १७७२ पैकी १,१८२ कोटी रुपये वाटले; महाराष्ट्र ठरला एक नंबर, दुसरे, तिसरे राज्य पहाल तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 17:25 IST

PM E-DRIVE Yojana Maharashtra : केंद्र सरकारच्या PM E-DRIVE योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादकांना १,१८२ कोटींची सबसिडी वितरित. महाराष्ट्रात सर्वाधिक विक्री. जाणून घ्या सवलतीचे फायदे आणि पूर्ण माहिती.

भारतात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वेगाने वाढत आहे. विशेषतः इलेक्ट्रिक दुचाकींच्या विक्रीत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे केंद्र सरकारकडून मिळणारी 'सबसिडी'. केंद्र सरकारची PM E-DRIVE योजना आता प्रभावीपणे लागू होताना दिसत आहे. अवजड उद्योग मंत्रालयाने ५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत या योजनेअंतर्गत वाहन उत्पादक कंपन्यांना १,१८२.३२ कोटी रुपयांचा परतावा दिला आहे. महाराष्ट्राला सर्वाधिक फायदा मिळालेला आहे.

इलेक्ट्रिक दुचाकींच्या क्रांतीमध्ये महाराष्ट्र राज्याने मोठी आघाडी घेतली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात तब्बल २,७१,८४९ वाहनांना सबसिडीचा लाभ मिळाला असून, हे प्रमाण देशात सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ कर्नाटक (१.५७ लाख), तामिळनाडू (१.४३ लाख), उत्तर प्रदेश (१.१५ लाख) आणि राजस्थान (९४ हजार) या राज्यांनी पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवले आहे. PM E-DRIVE योजनेतून देशातील ग्रामीण भागातील नागरिकही इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करताना या सवलतीचा थेट फायदा घेऊ शकतात. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कंपन्यांसाठी 'PLI' योजनेचा आधारया योजनेत वाहन कंपन्यांना करात (Tax) थेट सूट दिली जात नसली, तरी त्यांना PLI योजनेद्वारे मोठा आधार दिला जात आहे. प्रगत ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञानाशी संबंधित सुट्या भागांच्या निर्मितीवर कंपन्यांना १३ ते १८ टक्क्यांपर्यंत इन्सेंटिव्ह दिला जातो. यामुळे भारतातच ई-वाहनांचे उत्पादन वाढण्यास मदत होत आहे.

बजेट आणि उद्दिष्टसरकारने या योजनेसाठी एकूण १,७७२ कोटी रुपयांचे बजेट निश्चित केले आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत तब्बल २४.७९ लाख इलेक्ट्रिक दुचाकींना प्रोत्साहन भत्ता देण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. १ एप्रिल २०२४ नंतर नोंदणी झालेल्या इलेक्ट्रिक दुचाकींना या सवलतीचा लाभ मिळत आहे. आतापर्यंत १४,३९,२२४ ग्राहकांनी या योजनेचा फायदा घेतला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Government Allocates ₹1,182 Crore for Electric Vehicles; Maharashtra Leads

Web Summary : The government has allocated ₹1,182 crore for electric vehicle subsidies, benefiting 14,39,224 customers. Maharashtra leads with the most subsidized vehicles, followed by Karnataka, Tamil Nadu, Uttar Pradesh and Rajasthan. The PM E-DRIVE scheme promotes EV adoption, especially in rural areas, with incentives for manufacturers through the PLI scheme.
टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर