Vespa 75 वर्षांची झाली; स्कूटरची स्पेशल एडिशन लाँच, किंमत सव्वालाख

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 05:09 PM2021-08-20T17:09:57+5:302021-08-20T17:10:35+5:30

Vespa स्कूटरमध्ये Glossy Metallic Giallo रंग देण्यात आला असून dark smoke grey सीट देण्यात आली आहे. Vespa 75th एडिशन कंपनीच्या 1940 च्या दशकात आलेल्या OG Vespa वर प्रेरित आहे.

Piaggio launches Vespa limited edition scooters for 75th anniversary | Vespa 75 वर्षांची झाली; स्कूटरची स्पेशल एडिशन लाँच, किंमत सव्वालाख

Vespa 75 वर्षांची झाली; स्कूटरची स्पेशल एडिशन लाँच, किंमत सव्वालाख

Next

पियाजिओ कंपनीला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कंपनीने व्हेस्पा स्कूटरची दोन विशेष मॉडेल लाँच केली आहेत. यामध्ये 125 सीसी आणि 150 सीसीची ही मॉडेल आहेत. याची किंमत अनुक्रमे ₹1.26 लाख आणि ₹1.39 लाख रुपये एक्स शोरुम ठेवण्यात आली आहे. (Piaggio launches Vespa 75th-anniversary edition scooters: Check price, features and specs.)

Vespa स्कूटरमध्ये Glossy Metallic Giallo रंग देण्यात आला असून dark smoke grey सीट देण्यात आली आहे. पहिल्या मॉडेलमध्ये 125 सीसी इंजिन देण्यात आले असून 7,500rpm वर 9.93hp ताकद प्रदान करते. तर 5,500rpm वर 9.6Nm टॉर्क प्रदान करते. 150 सीसी इंजिन 10.32bhp ताकद आणि 10.60Nm टॉर्क प्रदान करते. या स्कूटरला एलईडी हेडलँप देण्यात आला आहे. तसेच कन्वेशनल टेल लँप देण्यात आला आहे. तसेच 150 सीसी मॉडेलमध्ये सिंगल चॅनेल एबीएस आणि 125 सीसी मॉडेलमध्ये कंबाईन्ड ब्रेकिंग सिस्टिम देण्यात आली आहे. या स्कूटरची बुकिंग 5000 रुपये देऊन करता येईल. 

1940 च्या Vespa कडून प्रेरणा
Vespa 75th एडिशन कंपनीच्या 1940 च्या दशकात आलेल्या OG Vespa वर प्रेरित आहे. कंपनीने ही स्कूटर ग्लॉसी मेटॅलिक पिवळ्या रंगात उतरविली आहे. साईड पॅनलवर 75 नंबर डिस्प्ले करण्यात आला आहे. तसेच फ्रंट बंपरला मॅट मेटालिक पायराइट रंग देण्यात आला आहे. 

1946 मध्ये आलेली पहिली स्कूटर
इटलीच्या या स्कूटर कंपनीने Vespa ब्रँडची पहिली चालू स्कूटर 1946 मध्ये लाँच केली होती. या स्कूटरचे नाव Vespa 98 होते. रोममध्ये गोल्फ क्लबमध्ये ती दाखविण्यात आली होती. यानंतर ती लोकांच्या मनात उतरली होती. 
 

Web Title: Piaggio launches Vespa limited edition scooters for 75th anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.