शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन; ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
बांगलादेशात आणखी एका हिंदू व्यक्तीची हत्या, २४ तासात दुसरी घटना
3
मित्रासाठी दिल्ली ‘मॅनेज’ करणारा नेता; पवारांना पंतप्रधान करण्यासाठी सुरेश कलमाडींची धाडसी खेळी
4
'या' कोट्यधीश युट्यूबरवर ईडीची कारवाई; जप्त केली बीएमडब्ल्यू-डिफेंडर कार, अनेक ठिकाणी छापे
5
"अक्षय खन्ना सेटवरही रहमान डकैतसारखं वागायचे..."; 'धुरंधर' अभिनेत्याचा मोठा खुलासा; रणवीरबद्दल काय म्हणाला?
6
काराकासमध्ये राष्ट्राध्यक्ष भवनावर ड्रोन हल्ला; ४५ मिनिटे तुफान गोळीबार, व्हेनेझुएला पुन्हा एकदा हादरले!
7
कोडिंग करणाऱ्या एआयची पहिली कंपनी बुडाली; फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; 'AI फ्रॉड' नाही तर 'हे' होते मुख्य कारण
8
‘बिनविरोध’च्या तक्रारीत तथ्य आढळल्यास नव्याने निवडणूक?; ६९ प्रकरणांची चौकशी, ‘नोटा’चे काय?
9
इराणमध्ये पेटला जनक्षोभ! आंदोलकांवर लष्करी कारवाई, ३५ जणांचा मृत्यू तर १२०० हून अधिक जण अटकेत
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, ६ जानेवारी २०२६ : आजचा दिवस आनंदाचा! आर्थिक लाभ संभवतात
11
ही संवेदनशीलता इतरांना कधी...? कार्यकर्त्यांसाठी मनाची घालमेल अन् अमित ठाकरेंचे वेगळेपण
12
‘बिनविरोध’वर गंडांतर; चेंडू आता हायकोर्टात, मनसेने दाखल केली याचिका, चौकशी करण्याची मागणी
13
काँग्रेसने ७० वर्षे शहरी विकासाकडे दुर्लक्ष केल्यानेच दुर्दशा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
14
शरद पवार पक्ष पुढे नेणार, की पुतण्यासोबत जाणार? मनपा निवडणुकीनंतर आगे आगे देखो होता है क्या!
15
ठाणे पालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार, ११० उमेदवार निवडून येतील: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
16
आम्ही काय केले? विचारणाऱ्यांनी आरसा पाहायला हवा; नाव न घेता अजितदादांना फडणवीसांचा सूचक इशारा
17
भाजपवर टीका नाही, पालिका अन् तेथील स्थानिक प्रश्नांबद्दल बोललो; अजित पवारांचे स्पष्टीकरण
18
‘मायावी’ महामुंबईसाठी राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांचे ‘जाळे’; भाजप-शिंदेसेनेचा जाहीरनामा कधी?
19
सत्ता अबाधित ठेवायला पक्ष, घर फोडत आहेत, आमच्या कामांचे श्रेय तुम्ही का घेता?: उद्धव ठाकरे
20
सत्ताधाऱ्यांच्या काळात ठाणे शहराची ओळख बदलली; संजय राऊतांची महायुतीवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

Petrol @100: महाराष्ट्रातील या जिल्ह्यात पेट्रोलचा दर चक्क 100 झाला; जाणून घ्या आणखी किती वाढणार....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 13:38 IST

Petrol Price crossed 100 Rs mark in Maharashtra: आज पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली. दिल्लीत आज पेट्रोलच्या दरात 25 पैसे आणि डिझेलच्या दरात 25 पैसे वाढ झाली आहे. याचबरोबर दिल्लीत पेट्रोल 92.05 रुपये तर डिझेल 82.61 रुपये लीटर झाले. मुंबईमध्ये पेट्रोल 98.36 रुपये आणि डिझेल 89.75 रुपये लीटर झाले आहे.

Petrol Price today: मे महिन्याचा सुरुवातीला पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागताच दोन दिवसांनी देशभरात पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढायला (Patrol, Diesel Price Hike) सुरुवात झाली. दिल्लीत 90 दी पार केलेले पेट्रोल अनेक ठिकाणी शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. तर महाराष्ट्रातील एका जिल्ह्यामध्ये पेट्रोलच्या दराने बरोब्बर 100 चा आकडा गाठला आहे. (Petrol Price crossed 100 rupees per liter rate in Maharashtra Sindhudurg.)

आज पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली. दिल्लीत आज पेट्रोलच्या दरात 25 पैसे आणि डिझेलच्या दरात 25 पैसे वाढ झाली आहे. याचबरोबर दिल्लीत पेट्रोल 92.05 रुपये तर डिझेल 82.61 रुपये लीटर झाले. मुंबईमध्ये पेट्रोल 98.36 रुपये आणि डिझेल 89.75 रुपये लीटर झाले आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 98.84 रुपये आणि डिझेल 87.49 रुपये लीटर झाले आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोल 92.16 रुपये आणि डिझेल 85.45 रुपये लीटर झाले आहे. 

TATA मारुती, ह्युंदाईला टक्कर देणार; लोकप्रिय Tiago सीएनजीमध्ये येणार

महाराष्ट्रातील मुंबईमध्ये पेट्रोल शंभरीपार जाण्यास अद्याप दीड रुपयांचा फरक असला तरीदेखील महाराष्ट्रातील सिंधुदुर्गमध्ये पेट्रोलच्या दराने नेमका 100 रुपये प्रति लीटरचा दर गाठला आहे. सिंधुदुर्गला मिरज येथील ऑईल कंपन्यांच्या डेपोमधून पेट्रोल, डिझेलचा पुरवठा होतो. पेट्रोल, डिझेलचे दर हे डेपो ते पेट्रोल पंपांच्या अंतरानुसार कमी जास्त होत असतात. यानुसार मालवण आणि कट्टा येथील पेट्रोलच्या दरांनी 100 री गाठली आहे. तसेच इतर ठिकाणचे दरही काहीशा पैशांनी शंभरी गाठण्याच्या उंबरठ्यावर आहेत. 

आणखी किती दरवाढ होणार....पेट्रोल, डिझेलची दरवाढ पाहला असे वाटू लागले आहे की, क्रेडिट लुईसची भविष्यवाणी खरी ठरणार आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये आणखी 5.5 रुपयांची दरवाढ होणार आहे. पेट्रोल पुरविणाऱ्या कंपन्यांनी तोटा भरून काढण्याचा प्रयत्न केला तर पेट्रोलच्या दरात 5.5 रुपयांची प्रति लीटर वाढ आणि डिझेलच्या दरांत 3 रुपये प्रति लीटर वाढ होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली. परंतू भारताला जे कच्चे तेल येते त्याचा दर हा आजचा नसतो तर जवळपास 25 दिन आधीच्या दराने पुरवठा होतो. 

 

वेळोवेळी दरवाढदेशात पेट्रोल १०० रुपयांच्या वर जाण्याची ही दुसरी वेळ आहे. मागील पाच दरवाढींत पेट्रोल १.१४ रुपयांनी, तर डिझेल १.३३ रुपयांनी महागले आहे. मागच्या वर्षी मार्चमध्ये सरकारने पेट्रोल-डिझेलवरील करात मोठी वाढ केली होती. या करवाढीनंतर सरकारी तेल वितरण कंपन्यांनीही वेळोवेळी दरवाढ करून पेट्रोल २१.५३ रुपयांनी, तर डिझेल १९.१८ रुपयांनी महाग केले.

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलFuel Hikeइंधन दरवाढsindhudurgसिंधुदुर्ग