Orxa ची शानदार बाईक लवकरच भारतात येणार; 8 सेकंदात 100 kmph चा स्पीड, रेंज 200 किमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 12:57 PM2023-05-02T12:57:24+5:302023-05-02T12:57:56+5:30

देशांतर्गत कंपन्यांसोबत विदेशी कंपन्याही भारतीय बाजारपेठेत आपल्या इलेक्ट्रिक बाईक्स लाँच करत आहेत.

orxa mantis electric bike launch date in india on road price range features specifications | Orxa ची शानदार बाईक लवकरच भारतात येणार; 8 सेकंदात 100 kmph चा स्पीड, रेंज 200 किमी

Orxa ची शानदार बाईक लवकरच भारतात येणार; 8 सेकंदात 100 kmph चा स्पीड, रेंज 200 किमी

googlenewsNext

नवी दिल्ली : इलेक्ट्रिक स्कूटरनंतर आता भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक बाईकची  (Electric Bike)  मागणीही झपाट्याने वाढत आहे. बाजारपेठेत उत्तम रेंज, स्पीड आणि लूकसह लाँच करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक बाईक्सही तरुणाईला आवडत आहेत. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पेट्रोल बाईक सारख्या सर्व फिचर्ससह आलेल्या या बाईक चालवायला खूप किफायतशीर आहेत. 

आता देशांतर्गत कंपन्यांसोबत विदेशी कंपन्याही भारतीय बाजारपेठेत आपल्या इलेक्ट्रिक बाईक्स लाँच करत आहेत. यातच आता ऑर्क्सा मोटर्स (Orxa Motors) देखील आपल्या इलेक्ट्रिक बाईकसह भारतात दाखल होणार आहे. Orxa Mantis नावाने लॉन्च केलेली ही बाईक आपल्या लूकमुळे चर्चेत आहे. कोणत्याही स्पोर्ट्स बाईकला स्पर्धा देण्यासाठी अतिशय कलरफूल आणि शानदार लुक असलेली मांटिस लवकरच भारतात लॉन्च केली जाणार आहे. कंपनी येत्या दोन महिन्यांत ही बाईक भारतीय बाजारपेठेत लॉन्च करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

उत्तम रेंज
कंपनीचा दावा आहे की, मांटिस सिंगल चार्जमध्ये 200 किमीपर्यंत रेंज देऊ शकते. बाईकला 9 kWh चा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. हा बॅटरी पॅक 18 किलोवॅट मोटरला पॉवर देतो. साधारण चार्जरने बाईक 5 तासात आणि फास्ट डीसी चार्जरने 2.5 तासात पूर्ण चार्ज होऊ शकते. बाईकचा टॉप स्पीड 140 किमी प्रति तास आहे. तसेच ही बाईख फक्त 8 सेकंदात 100 किमी वेग पकडते.

खास फीचर्स 
बाईकमध्ये डीआयएलसोबत एलईडी लाइट्स, रियर मोनोशॉक आणि फ्रंट टेलिस्कोपिक फोर्क सस्पेंशन देण्यात आले आहे. यासोबतच अनेक खास फीचर्स देखील बाईकमध्ये देण्यात आली आहेत. बाईकमध्ये नेव्हिगेशन, राइड अॅनालिटिक्स, मेसेज आणि कॉल अलर्ट तसेच डिस्टन्स टू एम्प्टी, सर्व्हिस रिमाइंडर, रिमोट लॉकिंग अशी अनेक फीचर्स आहेत.

सध्या एकच व्हेरिएंट
सध्या कंपनी बाईकचे एकच व्हेरिएंट भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. येत्या काळात आणखी दोन व्हेरिएंट पाहायला मिळतील. भारतात लॉन्च केलेल्या व्हेरिएंटमध्ये डिस्क ब्रेक तसेच अॅलॉय व्हील स्टँडर्ड ऑफर म्हणून मिळतील. सध्या कंपनीने बाईल लॉन्च करण्याची अधिकृत तारीख आणि किंमत याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. परंतू असे म्हटले जात आहे की, ही बाईक 3 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत लॉन्च केली जाऊ शकते.

Web Title: orxa mantis electric bike launch date in india on road price range features specifications

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.