Ola S1X EV : ओला १५ ऑगस्टला स्वस्त आणि मस्त स्कूटर लाँच करणार; जाणून घ्या सविस्तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 16:37 IST2023-08-07T16:36:43+5:302023-08-07T16:37:05+5:30
ओला इलेक्ट्रिक ही सध्या देशातील सर्वात जास्त विक्री करणारी इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी आहे, कंपनीने जून २०२३ मध्ये १७,५७९ युनिट्सची विक्री नोंदवली आहे.

Ola S1X EV : ओला १५ ऑगस्टला स्वस्त आणि मस्त स्कूटर लाँच करणार; जाणून घ्या सविस्तर...
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी दुचाकी इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी ओला इलेक्ट्रिकने (Ola Electric) अलीकडेच भारतीय बाजारपेठेत आपली एस १ एअरला १.१० लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) बेस किमतीत एअर लाँच केली आहे. ज्यामुळे आता एस १ सीरीजमधील सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक स्कूटर बनली आहे. मात्र, ओला आता एस १ इलेक्ट्रिक स्कूटर सीरीजमध्ये आणखी एक मेंबर म्हणजेच नवीन स्कूटर लाँच करण्यासाठी सज्ज आहे.
ओला इलेक्ट्रिक लवकरच एस १ एअरपेक्षा अधिक परवडणारी स्कूटर लाँच करण्याच्या तयारीत आहे. या नवीन स्कूटरचे नाव एस १ एक्स ( S1X) असेल, जे एंट्री-लेव्हल मॉडेल म्हणून काम करेल आणि या स्वातंत्र्य दिनी म्हणजेच १५ ऑगस्ट २०२३ ला लाँच केले जाईल. हे सुरू केल्यानंतर कंपनीची व्याप्ती आणखी वाढणार आहे. तसेच, जे कमी किंमतीत दुचाकी इलेक्ट्रिक वाहने खरेदी करतात त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय म्हणून उदयास येईल.
दरम्यान, ओला एस १ एअर आपल्या थेट प्रतिस्पर्ध्यांपेक्षा आधीच परवडणारी आहे. मात्र, एस १ एक्स आणखी खरेदीदारांना आकर्षित करण्यात मदत करेल. कारण कंपनीने पुष्टी केली आहे की नवीन स्कूटर १ लाख रुपयांच्या कमी किंमतीला लाँच केली जाईल. ओला इलेक्ट्रिक ही सध्या देशातील सर्वात जास्त विक्री करणारी इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी आहे, कंपनीने जून २०२३ मध्ये १७,५७९ युनिट्सची विक्री नोंदवली आहे.
स्टूटरच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
कंपनीने अद्याप एस १ एक्स बद्दल कोणतेही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही, परंतु कंपनीच्या ऑफिशियल प्रझेंटेशनमध्ये असे म्हटले आहे की, नवीन एस १ एक्स 'ICE किलर' असणार आहे. एस १ एक्स समान किमतीच्या 125 सीसी पेट्रोल स्कूटरच्या तुलनेत कशी मायलेज देते, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. प्रझेंटेशनदरम्यान कंपनीने दाखवलेल्या फोटोनुसार, एस १ एक्स काही स्पष्ट कॉस्ट कटिंग टेक्नॉलॉजीसह एस १ एअर आणि एस १ प्रो या भावंडांपेक्षा अधिक बेअर-बोन्स डिझाइन ऑफर करते.