Ola S1 Air ची धूम! बुकिंग विंडो उघडताच 3 हजार इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 13:14 IST2023-07-28T13:13:18+5:302023-07-28T13:14:28+5:30
या स्कूटरची बुकिंग आजपासून सुरू झाली आहे. बुकिंग विंडो उघडताच ग्राहकांची धूम पाहायला मिळाली.

Ola S1 Air ची धूम! बुकिंग विंडो उघडताच 3 हजार इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री
नवी दिल्ली : देशात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. सध्या देशात इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीच्या बाबतीत ओला (Ola) पहिल्या क्रमांकावर आहे. कंपनीने अलीकडेच Ola ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर S1 Air लाँच केली आहे. या स्कूटरची बुकिंग आजपासून सुरू झाली आहे. बुकिंग विंडो उघडताच ग्राहकांची धूम पाहायला मिळाली.
बुकिंगच्या पहिल्या काही तासांतच 3 हजार इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री झाली आहे. यासंदर्भातील माहिती कंपनीचे सीईओ आणि संस्थापक भाविश अग्रवाल यांनी ट्विटद्वारे दिली आहे. दरम्यान, इलेक्ट्रिक स्कूटर S1 Air ची सुरुवातीची किंमत 1.09 लाख रुपये असणार आहे. याचबरोबर, स्कूटरची मर्यादित खरेदी विंडो 28 ते 30 जुलै दरम्यान उघडली जाईल, त्यानंतर खरेदीदारांना स्कूटरसाठी 1.20 लाख (एक्स-शोरूम) भरावे लागतील.
3000! I’m also heading to the factory now 😳 https://t.co/q89piwCOfA
— Bhavish Aggarwal (@bhash) July 27, 2023
ओला S1 Air या वर्षी फेब्रुवारीमध्ये भारतीय बाजारात 99,999 रुपये (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आली होती. ही इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जवर 91 किमीची रेंज आणि 8.5 kW मोटरसह येते. स्कूटरची बॅटरी घरातील चार्जरने चार तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते. कंपनीकडून S1 Air स्कूटर 11 कलर ऑप्शनमध्ये ऑफर करण्यात आली आहे. यामध्ये ओचर, लिक्विड सिल्व्हर, मॅट ब्लॅक, कोरल ग्लॅम, मिडनाईट ब्लू, जेट ब्लॅक, मार्शमॅलो, अँथ्रेसाइट ग्रे, मिलेनिअल पिंक, पोर्सिलेन व्हाइट आणि निओ मिंट कलरचा समावेश आहे.
कधीपासून सुरू होणार डिलिव्हरी?
कंपनीचे सीईओ आणि संस्थापक भाविश अग्रवाल यांनी ट्विटद्वारे सांगितले की, या स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटरची डिलिव्हरी ऑगस्टच्या सुरुवातीपासून सुरू होईल.