शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
4
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
5
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
6
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
10
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
11
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
12
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
13
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
14
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
15
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
16
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
17
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
18
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
19
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
20
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी

ओलाने फेब्रुवारीत असा आकडा फुगविला; रोडस्टर अद्याप रस्त्यावर आली नाही ती विकल्याचे दाखविले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 14:14 IST

Ola Electric Sales: ओलाने फेब्रुवारी महिन्यात  25,207 गाड्या विकल्याचा आकडा जाहीर केला होता. धक्कादायक बाब म्हणजे यात निम्म्या गाड्या या अद्याप लाँच न झालेल्या आहेत.

ओला ईलेक्ट्रीकने फेब्रुवारी महिन्यात विक्री केलेल्या वाहनांच्या आकड्यात मोठी तफावत आढळली होती. शेअर बाजाराला दिलेला आकडा आणि परिवाहन मंत्रालयाकडे विक्रीची नोंदणी झालेला आकडा यात जमीन आस्मानाचा फरक होता. यावरून मंत्रालयाने ओलाला नोटीस पाठवत खुलासा मागविला होता. आता ओलाचा खुलासा आला आहे. 

ओलाने फेब्रुवारी महिन्यात  25,207 गाड्या विकल्याचा आकडा जाहीर केला होता. धक्कादायक बाब म्हणजे यात निम्म्या गाड्या या अद्याप लाँच न झालेल्या आहेत. यामुळे ओलाच्या या बनवाबनवीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. लाँच न झालेल्या गाड्या यात कशा काय दाखविण्यात आल्या असा सवाल आता उपस्थित होत आहे. 

ओलाने फेब्रुवारीमध्ये 15,533 युनिट्सचे उत्पादव केले होते. यात 3,715 स्कूटर या ओलाच्या तिसऱ्या पिढीतील होत्या. तर वाहन पोर्टलवर ओलाच्या 8,647 वाहने रजिस्टर झाल्याचा आकडा होता. आकड्यातील या तफावतीवरून ओलाला मॉर्थने तीन नोटीस पाठविल्या आहेत. तसेच अवजड उद्योग मंत्रालयाने (एमएचआय) ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) कडून या प्रकरणाचा अहवाल मागितला आहे. 

ओलाने या उत्तरात आपण बुकिंग पूर्ण झालेल्या म्हणजेच ग्राहकांनी पैसे भरलेल्या गाड्यांचा आकडा दाखविल्याचे म्हटले आहे. आमची फेब्रुवारी २०२५ ची विक्री घोषणा प्राथमिक बुकिंगवर नाही तर पूर्ण पैसे भरून आणि पुष्टी केलेल्या ऑर्डरवर आधारित होती. आम्ही या सशुल्क ऑर्डरवर आधारित आमचा विक्री डेटा जाहीर केला. इन-हाऊस प्रक्रियेमुळे वाहन पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया विस्कळीत झाली होती, यामुळे या गाड्या बुक होऊ शकल्या नाहीत, असे ओलाने म्हटले आहे. 

तसेच आमच्या नवीन उत्पादनांचा म्हणजेच जेन ३ ओला स्कूटर आणि रोडस्टर एक्ससाठी ग्राहकांनी पूर्ण पैसे दिलेल्या ऑर्डरचा यात समावेश आहे, असे ओलाने म्हटले आहे. या आकडेवारीनुसार जेन तीनच्या 10,866 स्कूटरचा समावेश आहे, ज्यांची डिलिव्हरी मार्चमध्ये करण्यात येणार होती. तसेच १,३९५ युनिट्स रोडस्टर एक्स देखील यात दाखविण्यात आल्या आहेत. परंतू, खरे पाहिले तर रोडस्टर अद्याप रस्त्यावर आलेली नाही. म्हणजे विक्रीच झालेली नाही. तरीही ओलाने त्याची विक्री झाल्याचे फेब्रुवारीत दाखविले होते. म्हणजेच २५००० विक्रीच्या आकड्यात ज्या गाड्या उत्पादितच झाल्या नाहीत किंवा विक्री झाली नाही अशा निम्म्या गाड्या आहेत. 

टॅग्स :Olaओलाelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर