Okaya Faast इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जमध्ये देते १६० किमी रेंज; जाणून घ्या, किंमत आणि फीचर्स...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 17:51 IST2022-07-13T17:50:48+5:302022-07-13T17:51:35+5:30
Okaya Faast Electric Scooter : बाजारातील इलेक्ट्रिक स्कूटरच्या रेंजमधील ओकाया फास्ट (Okaya Faast ) या इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल जाणून घेऊया, जी कंपनीची लोकप्रिय स्कूटर आहे आणि तिला रेंज आणि स्पीडमुळे पसंत केली जाते.

Okaya Faast इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जमध्ये देते १६० किमी रेंज; जाणून घ्या, किंमत आणि फीचर्स...
नवी दिल्ली : टू-व्हीलर सेक्टरमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईकची मागणी प्रचंड वाढली आहे, त्यामुळे वाहन निर्मात्या कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक टू व्हीलर लाँच करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये कमी किमतीपासून ते मोठ्या रेंजपर्यंत इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध आहेत. दरम्यान, बाजारातील इलेक्ट्रिक स्कूटरच्या रेंजमधील ओकाया फास्ट (Okaya Faast ) या इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल जाणून घेऊया, जी कंपनीची लोकप्रिय स्कूटर आहे आणि तिला रेंज आणि स्पीडमुळे पसंत केली जाते.
ओकाया फास्टच्या बॅटरी आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने यामध्ये ७२ V, ६० Ah क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक दिला आहे. या बॅटरीसोबत १२०० W BLDC मोटर जोडलेली आहे. बॅटरी पॅकच्या चार्जिंगबद्दल कंपनीचा दावा आहे की, ओकाया फास्ट नॉर्मल चार्जरने चार्ज केल्यानंतर ४ ते ५ तासांत पूर्ण चार्ज होते. स्कूटरच्या रेंजबाबत कंपनीचा दावा आहे की एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही ओकाया फास्ट १४० ते १६० किमीची रेंज देते. या रेंजसह, कंपनी ६० kmph च्या टॉप स्पीडचा दावा करते.
स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्या पुढच्या आणि मागील दोन्ही चाकांमध्ये ड्रम ब्रेक्स बसवण्यात आले आहेत, जे कॉम्बी ब्रेकिंग सिस्टमला जोडलेले आहेत. यासोबत अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर जोडण्यात आले आहेत. तसेच, कंपनीने स्कूटरमध्ये DRLs, चार्जिंग पॉइंट, फास्ट चार्जिंग, डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ट्रिप मीटर, डिजिटल ओडोमीटर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, रिमोट स्टार्ट, पुश बटण स्टार्ट, अँटी थेफ्ट अलार्म, सेंट्रल लॉकिंग, रीजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम, ICDT असे अनेक फीचर्स दिले आहेत.
याचबरोबर, स्कूटरमध्ये पार्किंग मोड, एलईडी हेडलॅम्प, एलईडी टेल लॅम्प, एलईडी टर्न सिग्नल लॅम्प यांचा देखील समावेश आहे. याशिवाय, किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास कंपनीने ओकाया फास्टची सुरुवातीची किंमत ९९ हजार रुपये (एक्स-शोरूम) सह बाजारात लॉंच केली आहे. या ओकाया फास्टची ही सुरूवातीची किंमत देखील तिची ऑन-रोड असतानाची किंमत आहे.