शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 15:07 IST

ही बाईक एकदा फूल चार्ज केल्यानंतर 175 किलोमीटरपर्यंतची रेंज देते. तसेच, या बाईकमध्ये तुम्हाला इतर फिचर्स सुद्धा मिळतील.

नवी दिल्ली : दररोज वापर करण्यासाठी ज्या लोकांना बाईक हवी आहे आणि पेट्रोलचा सु्द्धा खर्च टाळायचा आहे. अशा लोकांसासाठी Oben Electric Rorr EZ ही इलेक्ट्रिक बाईक एक चांगला पर्याय ठरू शकते. ही बाईक एकदा फूल चार्ज केल्यानंतर 175 किलोमीटरपर्यंतची रेंज देते. तसेच, या बाईकमध्ये तुम्हाला इतर फिचर्स सुद्धा मिळतील.

ओबेनच्या दाव्यानुसार, बाईकचे टॉप मॉडेल एकदा फूल चार्ज केल्यानंतर 175 किलोमीटरपर्यंतची रेंज देते. याचबरोबर, बाईकच्या लोअर व्हेरिएंटची रेंज यापेक्षा किंचित कमी असू शकते. ही बाईक पुन्हा पुन्हा चार्ज करण्याची गरज भासणार नाही, एकदा चार्ज केल्यानंतर ती जास्त काळ टिकेल. 

बाईकचा टॉप स्पीड 95 किलोमीटर प्रति तास आहे. ही बाईक 3.3 सेकंदात 0-40 किमी प्रतितास चालवता येते. इतकेच नाही तर या बाईकमध्ये तुम्हाला फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील मिळत आहे. या बाईकची बॅटरी 45 मिनिटांत 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते.

फीचर्स आणि कलर ऑप्शनया इलेक्ट्रिक बाईकमध्ये तुम्हाला 3 राइडिंग मोड मिळत आहेत. यामुळे राइडची गुणवत्ता सुधारते आणि तुमचा राइडिंगचा अनुभव चांगला होतो. तुम्हाला ही बाईक 4 कलर ऑप्शनमध्ये मिळत आहे, ज्यामधून तुम्ही तुमचा आवडता रंग निवडू शकता. यामध्ये इलेक्ट्रो अंबर, सर्ज सायन, ल्युमिना ग्रीन आणि फोटॉन व्हाइट कलरचा समावेश आहे.ही बाईक ARX फ्रेमवर्कवर तयार करण्यात आली असून बाईकचे डिझाइन निओ-क्लासिक आहे. तरुणांना ही बाईक खूप आवडते. सध्याचा ट्रेंड आणि मागणी लक्षात घेऊन असा बाईकचा लूक तयार करण्यात आला आहे.

किंमत किती?इलेक्ट्रिक बाईक मार्केटमध्ये विविध व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. तसेच, बाईकच्या 2.6 kWh व्हेरिएंटच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर त्याची एक्स-शोरूम किंमत 89,999 रुपये आहे. तर या बाईकच्या 3.4 kWh व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 99,999 रुपये आहे आणि 4.4 kWh व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 1,09,999 रुपये आहे.

टॅग्स :bikeबाईकAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर