आता Tata Punch चं टेन्शन वाढणार, टक्कर देण्यासाठी येतेय Hyundai ची 'ही' Small SUV Car

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 10:32 PM2022-11-17T22:32:02+5:302022-11-17T22:33:08+5:30

पुढील वर्षी फेस्टिव्ह सिझनमध्ये ही कार विक्रीसाठी उपलब्ध असेल. हिची थेट टक्कर टाटा पंच सोबत असणार आहे.

Now the tension of Tata Punch will increase, Hyundai's small SUV car is coming to compete | आता Tata Punch चं टेन्शन वाढणार, टक्कर देण्यासाठी येतेय Hyundai ची 'ही' Small SUV Car

आता Tata Punch चं टेन्शन वाढणार, टक्कर देण्यासाठी येतेय Hyundai ची 'ही' Small SUV Car

googlenewsNext

सध्या देशात Hyundai च्या i10, i20 आणि Creta या कार उपलब्ध आहेत आणि आता ही कंपनी Small SUV Car घेऊन येत आहे. या कारचे नाव Hyundai Ai3 असे असेल. पुढील वर्षी फेस्टिव्ह सिझनमध्ये ही कार विक्रीसाठी उपलब्ध असेल. हिची थेट टक्कर टाटा पंच सोबत असणार आहे. टाटा पंच ही  एक मायक्रोएसयूव्ही सेगमेंटची कार आहे आणि हिची साईज सब 4 मीटर कॉम्पॅक्ट आहे. ग्लोबल NCAP एजन्सीकडून या कारला चांगले सेफ्टी रेटिंग देखील मिळाले आहे.

Hyundai Motor India Limited एक ऑल न्यू मायक्रोएसयूव्ही कारवर काम करत आहे. ती सर्वप्रथम स्थानिक बाजारात उपलब्ध होईल. ही कार ह्युंदाईची कॉम्पॅक्ट एसयूव्ही वेन्यू पेक्षा छोटी असेल. याच बरोबर ही एक 5 सिटर कार असेल. ह्युंदाईच्या या  मायक्रोएसयूव्ही कारसंदर्भात आतापर्यंत बरीच माहिती लिक झाली आहे आणि या कारसंदर्भात लवकरच ऑफिशियल रेंडर्सदेखील समोर येतील. सध्या या कारचा कोडनेम ह्युंदाई AI3 असेल. मात्र हिच्या फायनल व्हर्जनचे नाव काय असेल, यासंदर्भात कसल्याही प्रकारची माहिती अद्याप मिळालेली नाही.

Ai3 चे संभाव्य इंजिन - 
या कारच्या संभाव्य फीचर्ससंदर्भात बोलायचे झाल्यास, ह्युंदाई Ai3 मध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिनचा वापर करण्यात आला आहे. जे आय-10 नियोस आणि सीएनजी व्हर्जनमध्ये वापरले जाऊ शकते. भारतात ह्युंदाईच्या बऱ्याच कार लोकप्रिय होत आहेत. मत्र, ही कार सीएनजी व्हेरिअंटमध्ये यणार, हायब्रिड व्हर्जनमध्ये लॉन्च होणार, की कंपनी नॉर्मल पेट्रोल इंजिनचा वापर करून ही लॉन्च करणार, यासंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही.
 

Web Title: Now the tension of Tata Punch will increase, Hyundai's small SUV car is coming to compete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.