आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 19:28 IST2025-08-19T19:26:51+5:302025-08-19T19:28:48+5:30
आता कंपनीने या कारला जलद चार्जिंग स्पीडही दिला आहे, यामुळे ही कार पूर्वीपेक्षाही अधिक व्यावहारिक बनली आहे. तर जाणून घेऊयात अपडेट्ससंदर्भात...

आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
टाटा मोटर्सच्या सर्वात लोकप्रिय आणि परवडणाऱ्या इलेक्ट्रिक कारपैकी एक असलेली टाटा पंच ईव्ही (Tata Punch EV) आता आणखी बदलली आहे. फ्यूचरिस्टिक डिझाइन आणि प्रगत वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध असलेली पंच ईव्ही आता दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली आहे. याच बरोबर, कंपनीने तिला जलद चार्जिंग स्पीडही दिला आहे, यामुळे ती पूर्वीपेक्षाही अधिक व्यावहारिक अथवा प्रॅक्टिकल बनली आहे. तर जाणून घेऊयात अपडेट्ससंदर्भात...
नवे कलर ऑप्शन्स -
Punch EV मध्ये आता प्युअर ग्रे आणि सुपरनोव्हा कॉपर्सचा समावेश करण्यात आला आहे. या दोन कलर ऑप्शन्सनंतर ही कार आता एकूण सात कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध असेल. यात एम्पॉवर्ड ऑक्साइड, सीवीड, फियरलेस रेड, डेटोना ग्रे आणि प्रिस्टाइन व्हाइट सारख्या कलर्सचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे, हे सर्व कलर ब्लॅक रूफसह डुअल-टोन शेड्समध्ये मिळतील. यामुळे कार आधिक स्टायलीश दिसेल.
पुर्वीपेक्षा अधिक फास्ट चार्ज -
नव्या अपडेटसह पंच ईव्हीची DC फास्ट चार्जिंग स्पीड फास्ट करण्यात आली आहे. पूर्वी 10% ते 80% पर्यंत चार्ज करण्यासाठी 56 मिनिटे लागत होते. आता हे काम केवळ 40 मिनिटांत होईल. याशिवाय, केवळ 15 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये कार जवळपास 90 किमीपर्यंतचे अंतर चालण्यास सक्षम होईल.
टाटा पंच ईव्हीचे फीचर्स -
पंच इव्ही केवळ स्टायलिशच नाही, तर टेक्नॉलॉजीनेही परिपूर्ण आहे. या कारमध्ये 10.25-इंचाचे डुअल स्क्रीन सेटअप (इंफोटेनमेंट आणि इंस्ट्रूमेंट क्लस्टरसाठी) देण्यात आले आहे. याशिवाय वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay, रिअर AC व्हेट, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, एअर प्युरीफायर आणि 6-स्पीकर साउंड सिस्टिमही देण्यात आले आहे. कंफर्टसाठी या कारला व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स,अॅम्बियंट लाइटिंग आणि सिंगल-पेन सनरूफही देण्यात आले आहे.
सेफ्टी फीचर्स
ही कार सेफ्टीच्या बाबतीतही प्रगत आहे. या कारला सहा एअर बॅग, 360-डिग्री कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ESC), ऑटो होल्डसह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग, हिल होल्ड कंट्रोल आणि हिल डिसेंट कंट्रोल फीचर्स देण्यात आले आहेत. हे सर्व फीचर्स या कारला सेगमेंटची सर्वात सुरक्षित आणि विश्वासू इलेक्ट्रिक कारपैकी एक बनवतात.